Breaking News

*कन्हान परिसरात हिंदु गौरव दिवस थाटात साजरा* *शहर विकास मंच व भजन मंडळ कांन्द्री द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान परिसरात हिंदु गौरव दिवस थाटात साजरा*

*शहर विकास मंच व भजन मंडळ कांन्द्री द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान व कांन्द्री येथे हनुमान मंदिरात शहर विकास मंच आणि भजन मंडळ कांन्द्री द्वारे हिंदु गौरव दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन प्रभु श्रीराम च्या प्रतिमेचे पुजन करुन व प्रसाद वाटप करुन हिंदु गौरव दिवस थाटात साजरा करण्यात आला .


मागील वर्षी ५ ऑगस्ट २०२० ला श्रीराम मंदीर बांधकामचे भुमिपुजन अयोध्या नगरीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या भुमिपुजन सोहळाल्या एक वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर गांधी चौक येथे करण्यात आले असुन श्रीराम च्या प्रतिमेचे पुजन करुन व प्रसाद वाटप करुन हिंदु गौरव दिवस थाटात साजरा करण्यात आला असुन कांन्द्री येथे हनुमान मंदिर देवस्थान येथे भजन मंडळा व्दारे श्रीराम प्रतिमेचे पुजन कांन्द्री ग्राम पंचायत चे सदस्य शिवाजी चकोले व महेंन्द्र बाबु पलिये यांच्या हस्ते करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असुन हनुमान भजन मंडळ कांन्द्री द्वारे भजन कीर्तन, श्रीराम जय राम जय जय राम च्या जयघोष करित जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य ऋृषभ बावनकर, मधुकर कामडे, विक्रम वांढरे, प्रेमदास आकरे, शिवाजी चकोले , महेंन्द्र बाबु पलिये यांचे शाल श्रीफल देऊन स्वागत करण्यात आले व परिसरात प्रसाद वाटप करून हिंदु गौरव दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्र माच्या यशस्विते करिता वामन देशमुख, वासुदेव आकरे, शैलेश हिंगे, एकनाथ सरोदे, विठ्ठल पुंड, फुलचंद हेडाऊ सह ग्रामस्थानी सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …