Breaking News

रविकांत रागीट महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

*रविकांत रागीट महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न*

विशेष प्रतिनिधी प्रेमाचंद हटवार

दिशा बहुद्देशीय शिक्षण पर्यटन व पर्यावरण विकास संस्था रामटेक द्वारा संचालित रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय रामटेक येथे महाविद्यालयाचे प्राचार्य रविकांत रागीट आणि प्रा.जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रेमानंद हटवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीए प्रशासकीय विभाग प्रमुख प्रा. दिलीप गिरडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले स्पेक्ट्रम अकादमी नागपूरचे शाखा प्रमुख संदीप धोटे सर यांनी एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग यासारख्या स्पर्धा परीक्षेतील तयारी करत असताना विद्यार्थ्यांना येणार्‍या विविध अडचणींना सामोरं जाताना परीक्षेचा अभ्यासक्रम, मुलाखतीमध्ये येणार्‍या विविध अडचणी, विद्यार्थ्यांच्या मनात असणारी विविध प्रश्‍नांची उकल करून दिली,कामगारांच्या मुलांसाठी असणाऱ्या स्पर्धा परीक्षेत संबंधीच्या सरकारच्या विविध मोफत योजना या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार डॉली मॅडम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थी त्याचप्रमाणे प्रा.अनिल मिरासे प्रा. प्रशांत सरपाते प्रा. उर्मिला नाईक प्रा.चेतना ऊके प्रा.वानखेडे प्रा.ज्ञानेश्वर नेवारे, प्रा. बुरडकर, मोहनकर सर‌ आणि इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …