*बंदुकीच्या धाकावर सोनं चांदीचे दुकान लुटण्याचा प्रयत्न फसला*
*आरोपीं सुरक्षा कँमेर्यात कैद*
*तालुक्यातील पिपळा डाग बंगला येथील घटना*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेर: तालुक्यातील खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीत पिपळा डाकबंगला येथे मंगळवार ला सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाऊस सुरू असताना तीन अज्ञात इसम मोटर सायकल ने तुलसी ज्वेलर्स येथे आले व दुकानाच्या आत घुसून शटर बंद करून दोघांनी बंदूक काढून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दुकानाचे मालक मिलन सोनी व त्यांच्या पत्नी सीमा सोनी व जवळच असलेलं जर्मन शेफर्ड(टायसन) कुत्र काउंटर जवळ होते तीनही अज्ञात आरोपीने आत येऊन व शटर बंद करून मालकास धमकावून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला तसेच काउंटरचे लॉक उघडण्याचाही प्रयत्न केला दुकान मालक मिलन सोनी व त्यांच्या पत्नी यांनी सतर्कता बाळगून दुकानातून आतील बाजूस असलेले घरातील दार बंद केले असता चोरट्यांनी आतील दार पण उघडण्याचा प्रयत्न केला.
दुकान मालकांने शेजारील असलेल्या लोकांना चोर चोर करून आरडाओरडा केला त्यामुळे भीतीने चोर सावनेर दिशेने मोटरसायकल ने तीघेही पळून गेले सुदैवाने कोणतेही साहित्य चोरीला गेले नसून मोठी दुर्दैवी घटना होण्यापासून वाचली खापरखेडा पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे.

चोरट्यांचे हे कु्त्य दुकानात लागलेल्या सुरक्षा कँमेर्यात कैद झाली असुन त्याच फुटेजच्या आधारावर चोरट्यांचा छडा़ लावण्याचा खापरखेडा पोलीस प्रयत्न करत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज