*टेकाडी येथे विविध विकास कामाचे भुमीपुजन*

*विविध समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणार – मीनाक्षी बुधे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – टेकाडी ग्रामपंचायत चे उपसरपंच सौ . मीनाक्षी बुधे यांची प्रभारी सरपंच या पदावर नियुक्ति होताच त्यांनी टेकाडी ग्रामपंचायत अंतर्गत १४ वित्त आयोग योजना मध्ये मंजुर असलेल्या हायमास्ट लाईटचे श्री कृष्ण मंदिर परिसरात भुमिपुजन करुन तात्काळ हायमास्ट लाईट नागरिकांच्या सेवा करिता उपलब्ध करु असे आश्वस्त केले .
या प्रसंगी टेकाडी ग्रामपंचायत चे प्रभारी सरपंच सौ.मीनाक्षी सुरेंद्र बुधे , सदस्या आशा राऊत , सदस्य दिनेश चिमोटे , सुरेंद्र बुधे , उमेश कडू ,चक्रधर आखरे , गणेश हूड , मनोज मोहाडे , सुरेश वासाडे सह गावातील गावातील बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक.६ ऑगस्ट २०२१ रोजी टेकाडी ग्राम पंचायत येथे आमदार निधी अंतर्गत श्री. संतोष यादव ते श्री. अवदेश मल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम रुपए १० लक्ष , श्री. राधेशाम सिंह ते दशरथ राय यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम रुपए.५ लक्ष व श्री. विरेंद्र यादव ते दुर्गेश नावंगे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम रुपए.५ लक्ष अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन केले . या प्रसंगी आमदार आशिष जयस्वाल , वर्धराज पिल्ले , टेकाडी ग्रामपंचायत प्रभारी सरपंच मीनाक्षी बुधे , सह टेकाडी ग्रामपंचायत चे सर्व सदस्य , कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
*विविध समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणार – मीनाक्षी बुधे*
टेकाडी ग्रामपंचायत चे उपसरपंच सौ मीनाक्षी बुधे यांची प्रभारी सरपंच या पदावर नियुक्ति झाल्याबद्द्ल त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितले कि थांबलेले विकासाचे काम सुरळीत करणे , नवीन विकासाचे कामे आनणे , दलीत वस्तीचे काम , त्याचप्रमाणे नागरिकांच्या घरकुल चे कामे पुर्ण करणे , गावात हायमास्ट लाईट ची सुविधा करणे , मोक्षधामाचे सौंदर्यीकरण करणे , गावातील रस्ते व नाल्याचे बांधकाम करणे , गावात साफ सफाई नियमित करणे व ठेवने , सह अन्य नागरिकांच्या समस्या सोडवने या भर असेल असे त्यांनी सांगितले आहे . टेकाडी ग्रामपंचायत चे उपसरपंच सौ मीनाक्षी बुधे यांची प्रभारी सरपंच या पदावर नियुक्ति झाल्याबद्द्ल सर्व समस्त नागरिकांनी त्यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .
Maharashtra News Media सच की आवाज