Breaking News

*प्रहार जनशक्ती व्दारे नगर परिषद वर धडक मोर्चा , रिलायंस स्टोर्स चा विरोधात जोरदार प्रदर्शन* *विविध मांगणी करिता मुख्याधिकारी यांना दिले निवेदन*

*प्रहार जनशक्ती व्दारे नगर परिषद वर धडक मोर्चा , रिलायंस स्टोर्स चा विरोधात जोरदार प्रदर्शन*

*विविध मांगणी करिता मुख्याधिकारी यांना दिले निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – प्रहार जनशक्ती पक्ष कन्हान शहरा व्दारे तारसा रोड ते कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालया पर्यंत धडक मोर्चा काढुन शहरातील छोटया मोठया व्यापाऱ्यांच्या हितार्थ रिलायंस स्टोर्स चा विरोधात जोरदार प्रदर्शन करुन शहरात रिलायंस स्टोर्स उघडु देऊ नये तसेच दिव्यांग निधी वाटप करण्याच्या मागणी सह विविध मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना देऊन तात्काळ पुर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रहार जनशक्ती पक्ष नागपुर जिल्हा प्रमुख रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन कन्हान – पिपरी नगर परिषद क्षेत्रातील छोटया व्यापाऱ्यांचे कोरोना महामारी मुळे चांगलेच नुकसान झाले असल्याने रिलायंस स्टोर ला परवानगी देऊ नये. कारण रिलायंस स्टोर्स सारखे मॉल उघडले गेले तर छोटया व्यापाऱ्यांना भयंकर नुकसान होईल. यास्तव प्रहार जनशक्ती पक्ष कन्हान शहर द्वारे नगरसेवक विनय यादव यांच्या अध्यक्षतेखाली तारसा रोड चौक ते कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय पर्यंत निषेध धडक मोर्चा काढुन ज्यात लॉउडस्पीकर व हाथा ला काळी फित बांधुन प्रहार संगठन च्या पदाधिकार्यांनी रिलायंस स्टोर्स चा विरोधात जोरदार प्रदर्शन करुन कन्हान – पिपरी नगर परिषद मुख्याधिकारी यांना एक निवेदन देऊन रिलायंस स्टोर्स यांना नगर परिषद द्वारे ना हरकत प्रमाणपत्र न देण्याची मागणी केली असुन प्रहार दिव्यांग संगठना ने निवेदन देऊन दिव्यांग निधी वाटप करण्याची , शहरातील प्रत्येक बँकेत दिव्यांगा करिता वेगळे काउंटर बनविण्याची , रोजगारासाठी २०० स्के फुट , एक फिट जागा उपलब्ध करुन देण्याची , व दिव्यांगांना पाच टक्के आरक्षण तसेच नगर परिषद मध्ये नौकरी देण्याची मागणी केली आहे . या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख रमेश कारेमोरे यांनी कन्हान शहराला सुव्यवस्थित नगर रचना व स्वच्छ, सुंदर शहर बनविण्याचा संकल्प करण्याचा आपल्या मार्गदर्शनात पदाधिकार्यांना संबोधित केले. या प्रसंगी प्रहार कन्हान शहर अध्यक्ष विनय यादव, सनोज पनिकर, विजय पारधी, विनोद किरपान, मयुर भोपडे, प्रविन बेलखोडे, राजु राऊत, प्रविण माने, प्रदिप धांडे , सागर फरकाडे, जयवंत थोरात, आस्तिक वझेकर, विनोद चामट, आकाश गिरडकर, कार्तिक टेकाम, सावंत रोकडे, नारायण वकलकर, राजेश्वरी पिल्ले, बहन पटले, अनिता मेश्राम, धनराज वरठी, मनोहर मेश्राम, प्रमोद सोनवाने, जश रामटेके, निलु गोंडाणे, कैलाश सुर्यवंशी, पिमकी श्रीवास्तव, रविन्द्र लोंडे, अश्विन भिवगडे, शैलेश पाठक, राजेश गजभिये, राहुल बावणे, राहुल सलामे सह कन्हान प्रहार संगटने चे व प्रहार दिव्यांग संगटने चे पदाधिकारी , कार्यकर्ता आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …