*गड मंदिर रामटेक च्या लक्ष्मण मंदिरामध्ये नाग सापाने दिले दर्शन*
रामटेक प्रतिनिधि – ललित कनोजे
रामटेक – सायंकाळी 5 वाजता चा दरम्यान राम गड़ मंदिर रामटेक येथे लक्ष्मण मंदिरामध्ये कर्मचार्याना मंदिरामध्ये ठेवलेल्या कपड्याच्या पिशवी मागे काही आवाज येऊ लागला व तिथे पाहताच एक साप दिसून आला व तिथले पुजारी श्री संजयजी पंड्डे व मंदिर चे निरिक्षक बावनकर यांना सांगितले व त्यांनी लगेच वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक सर्प मित्र प्राणी मित्राचे सचिव अजय मेहरकुळे यांना त्वरित फोन वर लक्ष्मण मंदिरामध्ये साप दिसल्याची माहिती दिली व सर्प मित्र अजय मेहरकुळे यांनी वेळ न घालवता वाईल्ड चॅलेंजर चे अध्यक्ष राहुल कोठेकर व अक्षय घोडाकाडे यांना सोबत घेऊन साप पकडन्या करिता राम मंदिर ला निघाले व घटनास्थळ जाऊन काही कपड्याच्या बोऱ्या ठेवला होत्या त्या बाजूला करून पाहाले की तिथे एक मोठा ब्राऊन कोब्रा (नाग) साप दिसून आला व त्या सापाने फणा काढून सर्वांना दर्शन दिले व त्या सापाला सर्प मित्र नी सुखरूप बाहेर काढून सुखरूप पकड़ले व तिथल्या पुजारी व कर्मचाऱ्यांनी सर्प मित्र प्राणी मित्राचे आभार व्यक्त केले व त्या सापाला सर्प मित्र प्राणी मित्रानी रामटेक वन विभागामध्ये नेऊन पंचनामा करून वन रक्षक वैभव ऊगले यांच्या समक्ष घनदाट जंगलात सोडण्यात आले.
Maharashtra News Media सच की आवाज