*भन्तेने केली महिल शिष्याची गळा चिरुन हत्या* *अनैतिक संबधातून पिपळा (डाक बंगला) येथे घडला थरार* *कु्रकर्मा भन्तेचे स्वतः आत्महत्येचे दोन प्रयत्न फसले*

*भन्तेने केली महिल शिष्याची गळा चिरुन हत्या*

*अनैतिक संबधातून पिपळा (डाक बंगला) येथे घडला थरार*

*कु्रकर्मा भन्तेचे स्वतः आत्महत्येचे दोन प्रयत्न फसले*

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः तालुक्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पिपळा( डाक बंगला) येथील मोबाईल वर आलेले मेसेज व व्हाट्सअप मुळे तसेच अनेतिक संबंधचा वादामुळे पिपळा डाग बंगला ता.सावनेर भिक्कु निवास येथे भन्तेनी महिला शिष्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सदर घटना खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पिपळा डाक बंगला येथे रविवारला दुपारी एक दरम्यान घडली.

*मिळालेल्या माहिती नुसार पिपळा (डाक बंगला )ग्रामपंचायत कार्यालया जवळ असलेले शिवली बोधी भिक्कु निवास येथे आरोपी भदंत धम्मानंद थोरो(५८) (मुळ नाव रामदास झिंगुजी मेश्राम)संजय *गांधी नगर २ अमरावती, व मृतक श्रामनेरी बुद्धप्रिया(४५),मुळनाव कुसुम सुनील चव्हाण रा.इंदिरानगर जरीपटका नागपूर ,असे मृतकाचे नाव असून मृतकाच्या परिवारात एक मुलगी व एक मुलगा असून पती नोकरीवर आहे*

*आरोपी मागील पाच वर्षांपासून सदर घटनास्थळी राहत आहे व मृतकेचे व आरोपीचे प्रेम संबध असल्याने येथे ये जा सुरु होती परंतु रविवारला दुपारी बाराच्या दरम्यान दुसऱ्यासोबत सुरू असलेल्या प्रेमसंबंध च्या संशयावरून व मागील चार दिवसांपासून असलेला मोबाईल वरिल sms व्हाट्स अप वर येत असलेल्या मँसेजमुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले*

*आरोपीने दुपारी एकच्या दरम्यान पलंगावर आराम करत असलेल्या महिला शिष्याच्या चेहर्यावर तसेच मानेवर चाकू ने सपासप वार करत तीला रक्ताच्या थोळक्यात लोळवले.इतक्यातही त्याचा राग शांत न झाल्याने मु्तकाच्या हतोडीने डोक्यावर व मानेवर मरेपर्यंत वार करीत ठार केले*


*घटनेनंतर आरोपीने दोघांचेही मोबाईल फोडून बाहेर फेकले व आरोपीने छताला लागलेला हुकला दोरी बांधून स्वताला फाशी लावून आपली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण दोरी तुटल्याने त्याचा आत्महत्तेचा प्रयत्न फसला त्यानंतर भिक्कु निवासा समोरील जनार्धन नरड यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकर्यांनी वेळीच धाव घेत विहिरीतून बाहेर काढले नागरिकांनी वेळीच मदत केल्याने आरोपीचा जीव बचावला स्थानिकांनी घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना दिली असता घटनास्थळी आरोपीला अटक केली असून आरोपीविरुद्ध भादवी 302,कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …