Breaking News

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कोरोना ची तिसऱ्या लाटेचे संभाव्य योजना व उपाय प्रक्षिक्षण वर्ग*

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कोरोना ची तिसऱ्या लाटेचे संभाव्य योजना व उपाय प्रक्षिक्षण वर्ग*

नरखेड तालुका प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड : दिनांक २९ ऑगस्ट ला नरखेड येथे दुर्गा माता मंदिरात तालुका स्तरीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नरखेडच्या वतीने करण्यात आले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभावित विचार करून संघ स्वयंसेवकांनी समाजाच्या सेवा कार्याकरिता सजग सत राहून पूर्व तयारी म्हणून उपाय योजना करण्याकरिता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १० गावातून ४५ स्वयंसेवकांचा सहभाग झाला. कोरोना व्हॅरियस योगेश मांडवेकर यांचा सत्कार करण्यात आला.


या प्रशिक्षण वर्गात डॉ. हरीशजी महंत आरोग्य अधिकारी नरखेड यांनी व्याकसिनॅशन, कोरोना टेस्ट, रेमडीसीव्हर इंजेकशन, समाजात असणारे संभ्रम दूर करण्याकरिता मार्गदर्शन केले. डॉ. सोमनाथ रॊय कोरोना सेन्टरचे प्रमुख यांनी कोरोनाच्या काळात आहार कोणता व कसा घ्यावा आणि बालकांसाठी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. जगन्नाथ बेलसरे (आर्युवेदाचार्य) यांनी आयुर्वेदिक घरगुती उपाय योजना सांगितले. तर कोरोनाच्या काळात शारीरिक तंदुरुस्ती करिता सूर्यनमस्कार, सूक्ष्म योग्य, प्रयाणम याचे प्रात्यक्षिक विनायकराव रेवतकर (योगाचार्य) पतंजली योग समिती नरखेड यांनी करून दाखविले. प्रास्ताविक रामेश्वर शेंद्रे तर समारोप गुणवंत गिरडकर (भारती विचार मंच) यांनी आभार प्रदर्शन प्रज्वल खंडारे संचालन राहुल होले मोवाड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पुरुषोत्तम थोटे , विशाल रेवतकर, ओमप्रकाश कुर्वे, संदीप काळबांडे, गजेंद्र हवाले, मयूर वाघाळे, उत्कर्ष बालपांडे, दिनेश वंजारी,तुषार वाडबुद्धे, जयदीप गोहडे यांनी सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …