*कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांचे लाक्षणिक शंखनाद आंदोलन*
*मंदिरे व धार्मिक स्थळे सुरु करण्याची मागणी*
*कन्हान पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती . परंतु राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव आटोक्यात येत असुन राज्य शासनाने लाॅकडाऊन च्या निर्बंधात शिथिलता आणत अनेक गोष्टी सुरु करण्यात आले असुन मंदिरे व धार्मिक स्थळे बऱ्याच काळापासुन बंद असल्यामुळे भाजपा पारशिवनी तालुका व भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी गांधी चौक कन्हान येथे पोलीस स्टेशन च्या बाजुला असलेल्या हनुमान मंदिर समोर राज्य शासनाच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन कन्हान पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन तात्काळ राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे सुरु करण्याची मागणी केली आहे .
देशात , राज्यात , जिल्ह्यात , तालुक्यात , व शहरात कोरोना चा विळख्यातुन जवळपास आता बाहेर निघालेला असुन सध्याची सर्व राज्यांची कोरोना बाधितांची परिस्थिति बघितली तर सर्व साधारण असुन महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय नियम शिथिल करुन बार , शाॅपिंग माॅल , सरकार देशी दारुचे दुकान , हाॅटेल रेस्टाॅरेंन्ट , व लोकांच्या सुविधेतील सर्व सोयीचे साधने सुरु केले असुन बार आणि हाॅटेल ही मात्र दहा वाजता पर्यंत ची परवानगी देऊन खुले केले . पण संताची भुमि असलेल्या महाराष्ट्रात अद्यापही मंदिरे व धार्मिक स्थळे बंदच ठेवली असुन बार सुरु मंदिरे बंद असे काळे चित्र उभे केले असुन आजुबाजुच्या राज्यात महाराष्ट्रा सारखीच परिस्थिति असुन सामान्य लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेपोटी मंदिरे सुरु केली असुन कित्येक लोक महाराष्ट्रातुन जात येत असतात पण स्वत च्याच राज्यात सामान्य नागरिकांना मात्र त्या पासुन वंचित राहावे लागत असुन भाजपा महाराष्ट्र प्रदेश नेत्यांचा आदेशानुसार या काळ्या निर्णया विरोधात आणि मंदिरे , धार्मिक स्थळे तातडीने उघडावीत या मागणी करीता भाजपा पारशिवनी तालुका व भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे व शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात गांधी चौक कन्हान येथे पोलीस स्टेशन च्या बाजुला असलेल्या हनुमान मंदिर समोर राज्य शासनाच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन कन्हान पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे सुरु करण्याची मागणी केली आहे .

या प्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , महिला अध्यक्ष सरिता लसुंते , भाजपा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , जिल्हा महामंत्री जयराम मेहरकुळे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री अमोल साकोरे , तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका संगीता खोबरागड़े , सुषमा चोपकर , अनिता पाटील , वंदना कुरडकर , सुषमा मस्के , आरती वघारे , नितु गजभिए , तुलेषा नानवटकर , पौर्णिमा दुबे , सचिन वासनिक , संजय रंगारी , मयुर माटे , शैलेश शेळके , सचिन कांबळे , सौरभ पोटभरे , ऋषभ बावनकर , मनोज कुरडकर , अजय लोंढे , अदरीराम कनोजिया , राजेश देशभ्रतार , कैलासनाथ चौबे , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज