*भरदिवसा शिवनगर कन्हान ला घरासामोरून स्पेंडर दुचाकी चोरी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत शिवनगर कन्हान गल्ली नंबर २ प्रभाग क्रमांक .१ येथुन अज्ञात चोरांनी फिर्यादी प्रदीप कोंगे यांच्या घरासमोर उभी ठेवलेली लाल रंगाची हिरो कंपनीची स्पेंडर आई स्मार्ट दुचाकी वाहन भरदिवसा चोरून नेल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक .२१ ऑगस्ट २०२१ ला भरदिवसा दुपारी २ ते ३:३० वाजता दरम्यान फिर्यादी प्रदीप मारोतराव कोंगे वय ३६ वर्ष राहणार. शिवनगर कन्हान गल्ली नंबर २ प्रभाग क्रमांक.१ याने आपल्या घरा सामोर त्याची लाल रंगाची हिरो कंपनीची स्पेंडर आई स्मार्ट दुचाकी वाहन क्रमांक.एम एच ४० एव्ही २८१२ इंजन क्रमांक. एचए१२ईएमएफजेओ१४७५, चेसीस क्रमांक.एमबी एलएचए१२एसीएफ९जेओ१८२५, किंमत ३५००० रुपये ही त्याचा घराच्या गेट समोर उभी ठेऊन फिर्यादी प्रदीप कोंगे हा दुपारी आराम करून घरा बाहेर निघुन पाहिले असता त्यांची लाल रंगाची हिरो कंपनीची स्पेंडर आई स्मार्ट दुचाकी वाहन क्रमांक. एम एच ४० एव्ही २८१२ ही दिसुन आली नाही. करिता फिर्यादी प्रदीप कोंगे याने वाहनाचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता मिळुन न आल्याने फिर्यादी प्रदीप मारोतराव कोंगे यांची दुचाकी कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि गुन्हा दाखल करून तपासात घेतला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज