Breaking News

*डुमरी येथे ट्रक व मोटार सायकल मध्ये भीषण अपघात , एक गंभीर जख्मी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*डुमरी येथे ट्रक व मोटार सायकल मध्ये भीषण अपघात , एक गंभीर जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी शिवारात एका ट्रक चालकाने आपले ट्रक चुकीच्या मार्गने (राॅंग साईड) ने येऊन फिर्यादी च्या मोटार सायकल ला धकड मारुन जबर जख्मी केल्याने फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन व वैद्यकीय अहवाला वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक २९ आॅगस्ट २०२१ ला सायंकाळी ०६:३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी संजय वसंतराव कोलते वय ५३ वर्ष राहणार वार्ड नंबर दोन हनुमान नगर कन्हान हे पारशिवनी येथुन काम आटोपुन कन्हान येथे आपले मोटार सायकल क्रमांक एम एच ४० बी.डी. १९७९ नी येत असता एन एच ४० डुमरी शिवारातील पेट्रोल पंपा जवळील राईस मिलच्या समोर समोरुन ट्रक क्रमांक एम एच ४० बी.जी. ९३५९ च्या ट्रक चालकाने आपले ट्रक चुकीच्या मार्गने (राॅंग साईड) ने येऊन फिर्यादी संजय वसंतराव कोलते यांच्या मोटार सायकल ला धकड मारुन जबर जख्मी करुन त्यांच्या डावा पाय फ्रैक्चर झाल्याने तसेच पाठीला डाव्या खंद्यावर व डोक्याला डाव्या बाजुला मार लागुन जबर जख्मी केल्याने तसेच ट्रक चालकाने अपघाताची माहिती पोलीसांना न देता व जख्मी यास उपचार कामी रुग्णालय येथे न नेता घटनास्थळा वरुन पळुन गेल्याने फिर्यादी संजय वसंतराव कोलते यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन व वैद्यकीय अहवाला वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ३२२/२०२१ कलम २७९ , ३३७ , ३३८ , भादवि सहकलम १८४ , १३४ (अ)(ब) , ४/१२२ मोवाका तहत गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल रामटेके हे करीत आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …