*माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा भाजपात प्रवेश*
*बल्लारपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केला प्रवेश*

*विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार*
आवारपूर :-गौतम धोटे
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुदर्शन निमकर यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. बल्लारपूर येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सुदर्शन निमकर यांनी भाजपात प्रवेश घेतला. सुदर्शन निमकर यांच्या भाजपा प्रवेशाने राजुरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
आज बल्लारपूरात झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत निमकर यांनी भाजपात प्रवेश घेतला. सुदर्शन निमकर हे 1999 ते 2004 या कालावधीत कॉंग्रेसचे आमदार होते. त्यानंतर 2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढविली. आज त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. नितीन गडकरी यांनी भाजपाचा दुप्पटा घालत पुष्पगुच्छ देवून त्यांचे पक्ष प्रवेशाबाबत स्वागत केले. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, अॅड. संजय धोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे आदींची प्रामुख्याने उपस्थीती होती. देशात नरेंद्रभाई मोदी, अमीतभाई शाह, नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात विकासाचा झंझावात सुरू आहे. राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने राज्याला आघाडीवर नेले आहे. चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्हयात अभूतपूर्व असा विकास अनुभवला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीत आपण प्रवेश घेतला असून यापुढील काळात भाजपाचे संघटनकार्य या विधानसभा क्षेत्रात अधिक बळकट करत जनसामान्यांपर्यंत भाजपाचे विचार पोहचविण्याचे काम आपण करणार असल्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यावेळी बोलताना म्हणाले.
माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासह सुधाकर पाटील गोरे, पुरूषोत्तम आस्वले, संजय आस्वले, पंकज विरूटकर, नितीन बामरटकर, काशीनाथ पाटील गोरे, सुभाष ढवस, निळकंठराव मत्ते, हरीदास झाडे, विठ्ठलराव येवले, सुरेश पावडे, आदित्य भाके, ऋषी जेऊरकर, विलास पाटील सुर आदी असंख्य समर्थकांनी आज भाजपात प्रवेश घेतला.
Maharashtra News Media सच की आवाज