*सिहोरा येथील कुमारी प्राची नन्नावरे ज्युनियर सेंन्ट्रल इंडिया २०२१ ची प्रथम विजेता*
*कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नागपुर येथे सिनेस्टेप द्वारा आयोजित ” ज्युनिअर सेंन्ट्रल इंडिया फॅशन शो २०२१” या स्पर्धेत कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत सिहोरा गावाची रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ही प्रथम आल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून तिला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
नागपुर येथे सिनेस्टेप द्वारे आयोजित ” ज्युनिअर सेंन्ट्रल इंडिया फॅशन शो २०२१” या स्पर्धेत नागपुर, पुणे, इंदौर, रायपुर, बंगलुरू, हैदराबाद येथुन एकुण ४५० स्पर्धकांनी ऑनलाईन सहभाग घेतला असुन या मध्ये बौद्धिक व विविध प्रकारचे राऊंड घेण्यात आल्याने नागपुर ग्रामीण क्षेत्रातील कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत सिहोरा गावची रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे हीने आपल्या टारगेट राऊंड मध्ये सुंदर अभिनय दाखवुन व रॅम्प वाॅक करून उपस्थित परिक्षकांना मोहित केले. या क्रार्यक्रमास विशेष अतिथी अभिनेत्री इंटरनेशनल माॅडल साक्षी मेश्राम, सायली टेकाडे, धनिष्ठा सिद्धार्थ, साक्षी सातपुते, इंटरनेशनल मेकअप आर्टिस सुनिता कांबळे, माॅडल राशी गजभिये आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ज्युनियर सेंन्ट्रल इंडिया २०२१ मधील प्रथम विजेता कुमारी प्राची नन्नावरे हिला दिग्दर्शक अनिल सहारे यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव करून शुभेच्छा दिल्या. अनिल सहारे यांनी नागपुर उपराजधानी व सिनेस्टेप द्वारे झालेल्या फॅशन शो ने नाव लौकीक केले असुन उपस्थित सहभागी माॅडल व त्यांच्या परिवारांना मार्गदर्शन करून त्यांचे आभार व्यक्त केले. दिग्दर्शक अनिल सहारे यांच्या मार्गदर्शनावर उपस्थित सहभागी माॅडल व कुटुंबाने त्यांचे आभार माणुन नागपुर मध्ये फिल्मी सिटी बनविण्याकरिता वाटचाल करणाऱ्या अनिल सहारे यांना शुभेच्छा दिल्या. ज्युनियर सेंन्ट्रल इंडिया फॅशन शो मध्ये फॅशन पार्टनर , माॅक्स फॅशन इंडिया, सॅम फोटोग्राफी यांचे विशेष सहकार्य लाभले असुन कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रसिका श्रीवास, कन्हेलाल मुरमु , लक्ष्मीकांत गजभिये , दिनेश शहाणे, कोमल, सुरेश आदीने सहकार्य केले.

कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी केले सत्कार
” ज्युनिअर सेंन्ट्रल इंडिया फॅशन शो २०२१” मध्ये कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत सिहोरा गावची रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ही प्रथम आल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी तिच्या निवास्थानी जाऊन मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या हस्ते प्राची नन्नावरे हिला पुष्पगुच्छाने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे कामेश्वर शर्मा , महेंद्र साबरे, हरीओम प्रकाश नारायण, निलेश गाढवे, सचिन ढोबळे, हर्ष पाटील सह आदि मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज