Breaking News

*कांन्द्री येथुन हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी वाहन चोरी* *फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला*

*कांन्द्री येथुन हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी वाहन चोरी*

*फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत साईकृपा जनरल स्टोअर्स कांन्द्री येथुन रमेश मानकर यांची हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी वाहन चोरी गेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक २८ ऑगस्ट २०२१ ला रात्री ९:३० वाजता दरम्यान रामटेक वरून हिंगणा कडे जात असतांना फिर्यादी रमेश पांडुरंग मानकर वय ५८ वर्ष राहणार वार्ड नंबर एक बाजार चौक हिंगणा यांची हिरो होंडा पॅशन प्लस मोटार सायकल क्रमांक. एमएच ४० जी ७५२९ किंमत १८,००० रुपये ही खराब झाल्याने रमेश मानकर यांनी आपली हिरो होंडा पॅशन प्लस मोटार सायकल ला साईकृपा जनरल स्टोअर्स कांद्री च्या समोर रोडवर उभी करून ठेवली व आपले घरी निघुन गेले. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक.२९ ऑगस्ट २०२१ ला सकाळी १० वाजाता येवुन पाहिले असता त्यांची गाडी मिळुन न आल्याने फिर्यादी रमेश मानकर यांनी बुधवार दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी कन्हान पोलीस स्टेशन येथे तोंडी रिपोर्ट दिल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ३२३/ २०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …