*बिग ब्रेकिंग*
*झुंम्बा क्लास संचालाक व त्याच्या मित्रांने केले युवतीचे यौन शोषण*
*दोघेही नरधमांना अटक*
विशेष प्रतिनिधि
सावनेर – जबरी संभोग पो.स्टे . सावनेर दिनांक 25/10/2020 चे 13.30 वा . पासुन 31/08/2021 चे 18.00 वा . दरम्यान 19 वर्षीय पिडीत / फिर्यादी हि झूम्बा क्लासेस मध्ये आरोपी नामे- 1 ) शुभम दौलत नारेकर , वय 27 वर्ष , रा . होळी चौक , सावनेर याच्या कडे जात होती . सदर आरोपीने दि . 25/10/2020 चे 13.30 वा . सुमारास फिर्यादीला त्याचे घरी बोलावून बेडरूम मध्ये नेवून जबरदस्तीने तिच्याशी तिन वेळा शारीरिक संबंध केले व सदरची घटने बाबत कोणलाही न सांगन्याची धमकी दिली . तसेच सदरची घटना यातील आरोपी क्र . 2 ) निखील निळकंठराव भगत , वय 36 वर्ष रा . वार्ड क . 10 होळी चौक , सावनेर याला माहिती झाल्याने त्यांनीही फिर्यादीला वारंवार फोन करून धमकी देवून तिला दि . 02/08/2021 रोजी खापा रोड जवळ एका ठिकाणी नेवुन तिचा विनयभंग केला . तसेच आरोपी 2 ) निखील भगत याने पुन्हा दि . 21/08/2021 रोजी त्याच ठिकाणी नेवुन फिर्यादीशी जबरदस्ती शारीरिक संबंध केले .
त्यावर 31/08/2021 रोजी फिर्यादीच्या आईला सदर बाब माहिती झाल्यावर आरोपी निखील भगत याने तिला शिविगाळ करून धमकी दिली . सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम 376,376 ( 2 ) ( एन ) 354,354 ( ड ) 504,507,34 भा.द.वि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीतांना अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक मारुती मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली मसपोनि रासकर 9082196080 या करीत आहे .