Breaking News

*कन्हान पोलीस स्टेशन ला सरपंच व पोलीस पाटील ची सभा संपन्न* *सेवानिवृत्त पोलीस पाटील, देवाजी भोयर , श्रीराम नांदुरकर , मोतीराम ठाकरे यांचा सत्कार*

*कन्हान पोलीस स्टेशन ला सरपंच व पोलीस पाटील ची सभा संपन्न*

*सेवानिवृत्त पोलीस पाटील, देवाजी भोयर , श्रीराम नांदुरकर , मोतीराम ठाकरे यांचा सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान :- नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.श्री राकेश ओला साहेब नागपुर जिल्हा ग्रामिण यांच्या कार्यालयीन आदेशानुसार पाेळा, तान्हा पाेळा, गणपती उत्सव निमित्याने कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गावाचे सरपंच व पोलीस पाटील यांची सभा संपन्न झाली.


शुक्रवार दिनांक.३ ऑगस्ट राेजी दुपारी १२ वाजता गांधी चौक येथे हनुमान मंदिर परिसरात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत परिसरातील सरपंच व पाेलीस पाटील यांची मा.श्री पाेलिस अधिक्षक साहेब नागपुर जिल्हा ग्रामिण यांच्या कार्यालयीन आदेशानुसार पाेळा , तान्हा पाेळा, गणपती उत्सव निमित्याने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वांना सविस्तर सुचना समजावुन सांगण्यात आल्या तसेच काेराेना विषाणु संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना, शासन नियमाची काटेकोरपणे पालन करून खबरदारी घेण्याबाबत कळविण्यात आले. काेणत्या परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमावर शासना तर्फे बंदी घालण्यात आलेली असुन आपण त्या संदर्भात गावोगावी दंवडी देवुन सुचित करण्यास सांगण्यात आले. कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या केरडीचे पाेलीस पाटील देवाजी भोयर, बोरडाचे श्रीराम नांदुरकर, कांद्रीचे मोतीराम ठाकरे यांचा पोलीस निरीक्षक विलास काळे, गुन्हे निरिक्षक यशवंत कदम यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिन्ही पोलीस पाटील चा सत्कार करून सभेचा समारोप करण्यात आला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …