Breaking News

*कन्हान नदीत गाडेघाट ला बुडलेल्या तीन युवकाचा मृत्युदेह मिळाला* *दोन युवकांचे मृतदेह मिळायचे बाकी*

*कन्हान नदीत गाडेघाट ला बुडलेल्या तीन युवकाचा मृत्युदेह मिळाला*

*दोन युवकांचे मृतदेह मिळायचे बाकी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील गाडेघाट अम्मा चा दर्गा येथे १३ युवक दर्शना साठी आले होते. यापैकी पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार दिनांक ५ सप्टेंबर ला सकाळी ८ ते ९:३० वाजता च्या सुमारास घडली होती . या घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून युवकांचा शोध घेत तीन युवकाचा मुत्युदेह शोधण्यास य़श मिळाले आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार, सय्यद अरबाज ऊर्फ लकी (वय २२), अयाज बेग हफीज बेग (वय २०), मो. अनुअर मो. अल्फाज (वय १८), मो. सप्तहीन मो. इकबाल शेख (वय २१) व ख्वाजा बेग तबुस्सर बेग (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. कन्हान पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घाडेघाट येथील अम्माचा दर्गा धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. एक सप्टेंबर पासून येथे ताजुद्दीन बाबा यांचा शंभरावा ऊर्स सुरू झालेला आहे. उर्सला उपस्थित राहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. या ऊर्सला उपस्थित राहण्यासाठी १३ युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी काठावरील अम्मा चा दर्गा गाडेघाट येथे आले होते. समोरून वाहत असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात काही युवक अंघोळ करण्यासाठी गेले. तर काही युवक गाडीमध्ये आराम करीत होते. आंघोळ करीत असतांना एक युवक पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी एका मागे एक असे चार युवक गेले. मात्र, तेही वाहून गेले. उपस्थितांनी घटनेची माहिती कन्हान पोलिसांना दिली. माहिती मिळताच कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार विलास काळे पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होऊन पोलीसांनी जिवन सुरक्षा रक्षक दल व नागपुरचे गोताखोर यांय्या मदतीने युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केला असता रविवार दिनांक.५ सप्टेंबर ला सायंकाळी सय्यद अरबाज ऊर्फ लकी (वय २२) याचा गाडेघाट च्या समोर १ किमी वर महादेव घाट येथे मुत्युदेह मिळाला असुन सोमवार दिनांक.६ सप्टेंबर ला सकाळ पासुन शोध मोहीन सुरू केली असता कन्हान पासुन १० किमी लांब उनगाव जवळ कन्हान नदी पात्रात मो. सप्तहीन मो. इकबाल शेख (वय २१) याचा तर महादेव घाट येथे ख्वाजा बेग तबुस्सर बेग (वय १७) चा मुत्युदेहाचा शोध लागला. अश्या तीन युवकाचा मुत्युदेह मिळाला असुन दोघांचा शोध लागला नाही. पोळा च्या सण असल्याने सायंकाळी ५ वाजता शोध मोहीम थांबविले. उद्या परत शोध घेण्यात येणार आहे . अशी माहिती मिळाली आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …