Breaking News

*कन्हान नदीत बुडलेल्या चौथ्या युवकाचा मृत्युदेह सापडला* *काल सायंकाळी शोध मोहिम थांबविली , आज पुन्हा शोध मोहिम सुरु होणार*

*कन्हान नदीत बुडलेल्या चौथ्या युवकाचा मृत्युदेह सापडला*

*काल सायंकाळी शोध मोहिम थांबविली , आज पुन्हा शोध मोहिम सुरु होणार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील गाडेघाट अम्माचा दर्गा येथे दर्शनासाठी आलेल्या १३ युवकांन पैकी पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी उघडकीस आली. कन्हान पोलिसांनी गोताखोर च्या मदतीने युवकांचा शोध घेत तिसऱ्या दिवसी चौथ्या युवकाचा मुत्युदेह शोधण्यास य़श मिळाले आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार, सय्यद अरबाज ऊर्फ लकी (वय २२), अयाज बेग हफीज बेग (वय २०), मो. अनुअर मो. अल्फाज (वय १८), मो. सप्तहीन मो. इकबाल शेख (वय २१) व ख्वाजा बेग तबुस्सर बेग (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. कन्हान पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घाडेघाट येथील अम्माचा दर्गा धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. एक सप्टेंबर पासून येथे ताजुद्दीन बाबा यांचा शंभरावा ऊर्स सुरू झालेला आहे. उर्सला उपस्थित राहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. या ऊर्सला उपस्थित राहण्यासाठी १३ युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी काठावरील अम्माचा दर्गा गाडेघाट येथे आले होते. समोरून वाहत असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात काही युवक अंघोळ करण्यासाठी गेले. तर काही युवक गाडीमध्ये आराम करीत होते. आंघोळ करीत असताना एक युवक पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी एका मागोमाग चार युवक गेले. मात्र, तेही वाहून गेले. उपस्थितांनी घटनेची माहिती कन्हान पोलिसांना दिली. माहिती मिळताच कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार विलास काळे पोलीस कर्मचा-यासह घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी जिवन सुरक्षा रक्षक दल व नागपुरचे गोताखोर यांय्या मदतीने युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केला असता रविवार (दि.५) सायंकाळी सय्यद अरबाज ऊर्फ लकी (वय २२) याचा गाडेघाट च्या समोर १ किमी वर महादेव घाट येथे मुत्युदेह मिळाला. सोमवार (दि.६) ला कन्हान पासुन १० किमी लांब उनगाव जवळ कन्हान नदी पात्रात मो. सप्तहीन मो. इकबाल शेख (वय २१) याचा तर महादेव घाट येथे ख्वाजा बेग तबुस्सर बेग (वय १७) चा मुत्युदेहाचा शोध लागला. अश्या तीन युवकाचा मुत्युदेह मिळाला. मंगळवार (दि.७) सकाळ पासुन शोध मोहीन सुरू केला असता सिहोरा कन्हान नदीच्या पात्रात दुपारी १२.३० वीजता मो. अबुजर मो. अलताफ (वय १८) राह. बारई मोहल्ला दिग्रस, जि यवतमाळ याचा मुत्यदेह मिळाल्याने कामठी उपजिल्हा ग्रामिण रूग्णालयात श्वविच्छेदन करून सायंकाळी त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. अश्या प्रसारे तिसऱ्या दिवसी चौथ्या युवकाचा मुत्युदेह सापडला असुन काल पाचव्या शोध लागला नसल्याने सायंकाळी ६ वाजता शोध मोहीम थांबविण्यात येऊन आज परत शोध घेण्यात येणार आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …