*फसगत करणारा शर्मा कोण…?*

*अज्ञात आरोपी शर्माचा छडा़ लावण्याचे आव्हान*
कळमेश्वर – अंतर्गत 1 कि.मी. अंतरावरील कांचनगंगा लेआउट कळमेश्वर येथे दिनांक 08/05/2021 चे 15 , 00 वा . ते 21.06 वा . दरम्यान अज्ञात आरोपीने त्याचे मोबाईल वरून मित्र शर्मा नाव असे सांगुन फिर्यादी नामे- केशव दशरथ गणोरकर वय 58 वर्ष , रा . प्लॉट नं . 30 काचनगंगा लेआउट वार्ड क्र . 1 ब्राम्हणी कळमेश्वर यांचा विश्वास संपादन केला . यानंतर अज्ञात आरोपीने फिर्यादीला म्हटले की , ” पैश्याची गरज आहे . माझे कडे पैसे नाहीत , मला दुसऱ्याला पैसे पाठवायचे ‘ असे सांगुन आरोपीने ” तुम्हाला अगल्या व्यक्तीचे खात्याची लींक पाठवितो , त्यावर मी 5 रूपये टाकतो , तुम्ही व्हेरीफाय करने करीता दिलेल्या लींक वर 5 रू टाका ‘ असे सांगीतल्यावरून आरोपीने दिलेल्या लींक वर फिर्यादीने 5 रूपये पाठविले . तेव्हा आरोपीने पैसे नाही आले म्हणुन फिर्यादीस कळविले . त्यानतर फिर्यादीने पुन्हा लहान मुलाचे हाताने त्याचे मोबाईलवरून फोन – पे दबारे 5 रूपये पाठविले . तेव्हा सुद्धा शर्माने उशीरा येईल असे म्हणुन लीक फिर्यादीचे मोबाईलवर पाठवुन 9,999 रू टाकण्य सांगीतले . तेव्हा फिर्यादीचे लहान मुलाने दिलेल्या लींक वर 9,999 रू सेन्ट केले . त्यानंतर आरोपीने फिर्यादीस फोन करून म्हटले की , ” तुमची 1 रिक्वेस्ट झाली आहे . ही रिक्वेस्ट कम्प्लीट करने करीता आणखी 4 ट्रान्सजेक्शन करावे लागतील , नाहीतर जे पैसे फिर्यादीने पहील्या रिक्वेस्ट ला पाठविले ते ब्लॉक होवुन जाणार ” म्हणुन फिर्यादीचे लहान मुलाने , फिर्यादीचा ओळखीचा शर्मा नावाचा मित्र आहेत म्हणुन विश्वास ठेयुन , त्याचे सांगण्याप्रमाणे 9,999 / -रू . चे 3 ट्रान्सजेक्शन आणि 19,999 / -रू . चे 2 ट्रान्सजेक्शन असे एकुण 5 ट्रान्सजेक्शन करून रक्कम एकुण 69,995 / -रू . चा शर्माने पाठविलेल्या वेगवेगळया लींकवर पाठविले . अशाप्रकारे अज्ञात आरोपीने मित्र शर्मा नाव असे सांगुन फिर्यादीचा विश्वास संपादन करून फसवणुक केली आहे . स्टेट बॅक ऑफ इंडीया , शाखा कळमेश्वर येथील मॅनेजर यांचेशी फिर्यादीने चर्चा केली असता , त्यांनी फिर्यादीस कळविले की , ” तुमचे पैसे वापस मिळतील , त्याचप्रमाणे फोन – पे येथे त्यांचे सांगणप्रमाणे पुर्ण प्रोसीजर झालेली आहे , बॅकेची प्रोसीजर पुर्ण झाल्यावर फिर्यादीस पैसे परत मिळु शकते . फिर्यादीस त्याचे पैसे परत मिळतील म्हणुन , त्यावेळी फिर्यादीचे निराकरण झालेले होते . परंतु फिर्यादीस अद्यापपायेतो पैसे परत मिळालेले नाहीत , सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे . कळमेश्वर येथे आरोपीविरुध्द कलम 420 भादंवि सहकलम 66 ( क ) ( ड ) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरु आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ठाकुर मो.क 9422884815 हे करीत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज