Breaking News

*नाम मात्र राशन कार्ड लाभार्थी, राशन धान्या पासुन वंचित* *नाम मात्र दक्षता समिति व अधिकाऱ्यांमुळे नागरिकांचा खेळखंडोबा*

*नाम मात्र राशन कार्ड लाभार्थी, राशन धान्या पासुन वंचित*

*नाम मात्र दक्षता समिति व अधिकाऱ्यांमुळे नागरिकांचा खेळखंडोबा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील व कन्हान शहरातील नागरिकांचे शिधापत्रिका (राशन कार्ड) बनुन एक वर्षाचा कालावधी लोटुन लाभार्थी धान्या पासुन वंचित आहे. तसेच बंद असलेली अंतोदय राशन कार्ड योजना सुरू करून त्यांचे सुध्दा राशन कार्ड त्वरित बनवुन सर्व लाभार्थ्यांना सर कारी स्वस्त धान्याचा लाभ देण्याची मागणी नवोदय जनोत्थान संघटन कन्हान अध्यक्ष प्रविण गोडे च्या नेतृत्वात मा. नायब तहसिलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. गुरूवार ला नवोदय जनोत्थान संघटन कन्हान चे अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या नेतृत्वात पारशिवणी तहसिलदार यांना बंद असलेले सर्व शिधापत्रिका (राशन कार्ड) चालु करण्याकरिता निवेदन देऊन कोव्हिड – १९ मध्ये हजारों लोकांचे राशन कार्ड बनविण्यात आले, परंतु एक वर्षाचा कालावधी लोटुण सुध्दा विभागीय अधिकाऱ्यांच्या निद्रा अवस्थेमुळे राशन कार्ड लाभार्थी धान्या पासुन वंचित आहे. त्यांना धान्य कधी मिळणार हा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. तसेच विधवा, विकलांग, कैंन्सर, सिकलसेल आदि लोकांकरिता सरकार ने अंतोदय राशन कार्ड योजना लागु केली असुन ती योजना बंद का ? या लाभार्थांचे अंतोदय राशन कार्ड कधी बनणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. दक्षता समितीचे गठन होऊन सहा
महिन्याच्या वर झाले, आता पर्यंत दक्षता समिती ची एक ही सभा घेण्यात आली नसल्याने नागरिकांचे महत्वाचे विषय मांडणार कोणी कसे ? नाम मात्र दक्षता समिती व विभागीय अधिकाऱ्यांच्या निद्रा अवस्थेमुळे राशन कार्ड बनविणाऱ्या लोकांचा खेळ खंडोबा होत. नागरिकांना खो-खो खेडाळु प्रमाणे कधी या टेबलावर, कधी त्या टेबलावर, कधी सात दिवसांनी तर कधी पंधरा दिवसानी असे अर्जदाराला कमीत कमी चार वेळा तहसिल कार्यालयात सर्व काम धंदे सोडुन चकरा माराव्या लागतात. या सर्व विषयांवर चर्चा करून नवोदय जनो त्थान संघटन कन्हान अध्यक्ष प्रविण गोडे च्या नेतुत्वात शिष्टमंडळाने नायब तहसिलदार आडे साहेब यांना निवेदन देऊन बंद असलेल्या सर्व राशन कार्ड लाभार्थ्यांचे राशन कार्ड चालु करून त्यांना सरकारी स्वस्त धान्याचा लाभ देण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आली. या प्रसंगी नवोदय जनोत्थान संघटने चे उपाध्यक्ष संजय रंगारी, सचिव प्रदिप बावने, अखिलेश मेश्राम, दिनेश नारनवरे, राजेश मेश्राम, सुदर्शन उके, प्रविण माने सह आदि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …