Breaking News

*कन्हान सत्रापुर येथील दुकानाच्या ड्रॉवर मधुन पर्स चोरी* *मंगळसुत्र व नगदी तीन हजार रूपए असा एकुण ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपी ने केला चोरी*

*कन्हान सत्रापुर येथील दुकानाच्या ड्रॉवर मधुन पर्स चोरी*

*मंगळसुत्र व नगदी तीन हजार रूपए असा एकुण ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपी ने केला चोरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथील फिर्यादी सौ वैशाली मेश्राम हे यांच्या दुकानातील डॉवर मध्ये पर्स ठेऊन घराच्या आत चहा बनविण्या करिता गेले असता घरात जाऊन परत येत पर्यंत अज्ञात चोरा ने पर्स व त्यातील २४ ग्रम सोन्याचे मंगळसुत्र व नगदी ३ हजार रूपए असा एकुण ७३ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरूवार दिनांक ९ ला सकाळी ६.३० ते ७.३० वाजता दरम्यान सत्रापुर येथील फिर्यादी सौ वैशाली विजेंद्र मेश्राम वय ३३ वर्ष यांनी आपल्या घरीच असलेल्या जनरल स्टोर चे दुकान सकाळी ६.३० वा उघडले व काही वेळाने पाच मिनटा करिता घरामध्ये चहा बनवण्याकरिता गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने जनरल स्टोर चा पैसे ठेवण्या चे खुल्या डॉवर चा आत मधुन पर्स काढुन त्या मध्ये ठेवलेले २४ ग्रॅम सोन्याचे जुने मंगलसुत्र किमंत ७०,००० रूपये व नगदी ३,००० रूपये असा एकुण ७३,००० रूपयाचा मुद्देमाल असलेली पर्स चोरून नेल्याने फिर्यादी सौ वैशाली मेश्राम यांच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरूध्द अपराध क्रमांक ३३३/२१ कलम ३८० भादंवि नुसार गुन्हा नोंद केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निरिक्षक विलास काळे यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार अरूणकुमार सहारे व मंगेश सोनटक्के हे करित आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …