Breaking News

*आदर्श हायस्कुल व्दारे विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन, मास्क चे वितरण* *शाळेचे शिक्षक घरोघरी जावुन विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देत स्तुत्य उपक्रम*

*आदर्श हायस्कुल व्दारे विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन, मास्क चे वितरण*

 

*शाळेचे शिक्षक घरोघरी जावुन विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देत स्तुत्य उपक्रम*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – आदर्श हायस्कुल व आयडीयल कॉन्व्हेट हिंदी प्रायमरी शाळा कन्हान व्दारे कोव्हिड -१९ ने शाळा बंद असल्याने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासुन दुर असल्याने त्या त्या भागात शिक्षक जावुन ऑफलाईन शिक्षण देत स्तुत्य उपक्रम राबवित असुन शाळे तर्फे विद्यार्थ्यांना नोटबुक , पेन, मास्क चे वितरण करण्यात आले.


देशात , राज्यात , जिल्ह्यात , शहरात कोव्हिड-१९ च्या प्रादुभावाने मागील दिड ते दोन वर्षापासुन शाळा बंद असल्याने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासुन वंचित आहेत त्या करिता आदर्श हायस्कुल व आयडीएल काॅन्व्हेंट हिंदी प्रायमरी शाळा कन्हान च्या सर्व शिक्षकांनी ऑफलाइन शिक्षण देण्याकरिता कन्हान परिसरातील सत्रापुर, एम जी नगर, शिवनगर, कांन्द्री, कोलमाईन्स या भागात घरोघरी जाऊन विद्यार्थांना गोळा करून शिक्षण देत आहेत. शाळे व्दारे हा उपक्रम अत्यंत काळजीपुर्वक राबवित असल्याने पालकांकडुन शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच शाळे तर्फे विद्यार्थांना नोटबुक, पेन, मास्क चे वितरण आयडियल एज्यु. सोसायटी च्या अध्यक्षा श्रीमती पुष्पा त्रिवेदी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी संस्था सचिव श्री भरत सावळे, आदर्श हायस्कुल मुख्याध्यापि का सौ चंन्द्रकला एन मेश्राम व आयडियल काॅन्व्हेंन्ट हिंदी प्रायमरी च्या मुख्याध्यापिका सौ सुनिता देशमुख आणि शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी तसेच सत्रापुर निवासी कराटे प्रशिक्षण व समाजसेवक श्री दिपचंद शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …