*काँम्पेक्टर रोलर चोरनारा भाजप नेता पुत्र पोलीसांच्या जाळ्यात*

*काँम्पेक्टर रोलर चोरनारा भाजप नेता पुत्र पोलीसांच्या जाळ्यात*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेर – तालुक्यातील खापा पो.स्टे.अंतर्गत असलेल्या वाकोडी शिवारात सुरु असलेल्या रस्ते बांधकामावरून रोड रोलर चोरी झाल्याची तक्रार लक्ष्मण पावडे यांनी खापा पोलीस स्टेशन ला नोंदवली असता सदर घटनेचा तपास करत असतांना सदर चोरीच्या घटनेत क्षेत्रातील वरिष्ठ भाजप कार्यकर्ते यांच्या मुलला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

खापा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी गेलेल्या रोलर चा तपासात वलनी निवासी पंकछ तांदूळकर यास भादवी च्या कलम 389 नुसार अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय मानकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असुन यात अजुनही काही चैरींचा छडा़ लागतो की काय यावर क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

*सदर प्रकरणात क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुलाला आज अटक झाल्याने विविध चर्चा रंगत असुन वातवरण चांगलेच तापले आहे*

*सदर प्रकरणाचे विस्तृत माहिती घेतली असता ठेकेदार लक्षण पावडे यांचे पाटनसावंगी ते सिंदेवानी या रस्त्याचे देखरेखीचे दोन वर्षाचे कांत्रट असल्याने एलएनटी कंपनीचे सदर काँम्पेक्टर रोलर वाकोडी शिवारात मागील दोन महिन्यापासून बंद अवस्थेत पडले होते.तसेच सतत सुरु असलेल्या पावसात रस्ते देखरेखीचे कामे ही बंद असल्याने दिं 8 सप्टेंबर रोजी सदर रोलर चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने खापा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली*

*सदर तक्रारीवरूण आरोपी पंकज अशोक तांदुळकर यास काल रात्री दहाच्या सुमारास अटक करण्यात आली असता आरोपीने पोलीस तपासात सहकार्य करण्या आधी त्याची प्रकु्ती खराब झाल्याने उपचारासाठी तास प्राथमिक आरोग्य केन्द्र खापा येथे नेले असता डॉक्टरांच्या सल्यानुसार त्यास मेओ हाँस्पीटल येथे रेफर करण्यात आले.

*आज दि 12 सप्टेंबर रोजी आरोपीला सावनेर न्यायालयात हजर करुण पुढील तपासणी व चोरीला गेलेल्या रोलर तसेच गुन्ह्यात सहभागी इतर आरोपी आदिंचा तपास करण्यासाठी तीन दिवसीय पोलीस कोठडी मागीतली असता न्यायाधीशांनी पोलीसांची मागणी फेटाळून लावत आरोपीचा जामीन मंजूर करुण त्या पुढील तीन दिव दुपारी 12 ते 3-00 खापा पोलीसांना सदर प्रकरणात सहकार्य करण्याच्या सुचना दील्या.

*सदर घटनेतील चोरीला गेलेला रोड रोलर जप्त करणे,घटनास्थळावरुण बंद अवस्थेत असलेल्या रोलरला हलवीण्याच्या कार्यात वापरण्यात आलेले इतर वाहन व सदर घटनेतील इतर आरोपींना ताब्यात घेणेकरीता पोलीस कोठडी आवश्यक होती परंतु मि.न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारत आरोपीला जामीन दिल्याने सदर प्रकरणात स्थानिक भाजप नेता पुत्राचा सहभाग असल्याने ते दवडण्यात तर येणार नाही ना अश्या चर्चा रंगु लागल्या असुन खापा पोलीसांवर संशयास्पद डोळ्याने बघितल्या जात आहे.तर खापा पोलीस सदर आरोपी व घटनेतील इतर माहिती गोळा करण्यासाठी वरिष्ठ न्यायालयात पाचारण करते की नाही यावर जाणकारांचे लक्ष वेधले आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …