Breaking News

*नागपुर जिल्हा N.S.U.I चा मेट्रो स्टेशन वर धड़क मोर्चा* *पोलीस व कार्यकर्त्यात झडप अनेक कार्यकर्ते जखमी*

*नागपुर जिल्हा N.S.U.I चा मेट्रो स्टेशन वर धड़क मोर्चा*

*पोलीस व कार्यकर्त्यात झडप अनेक कार्यकर्ते जखमी*

नागपुर विशेष प्रतिनिधि

नागपुर – जिल्हा N.S.U.I तर्फे 2 दिवसा पूर्वी नागपुर महामेट्रो च्या मुख्यालयावर तीव्र आंदोलन करुण विविध मागण्याचे बाबतचे निवेदन दिले होते तसेच 2 दिवसात यावर्ति निर्णय न घेतल्यास 11 तारखेला “अधिकार रैली” काढण्यात येईल व मुख्य मेट्रो स्टेशन बन्द करण्यात येईल असे महा मेट्रोच्या अधिकार्यांशी चर्चेत व निवेदनातून म्हटले होते*

 

*परंतु मागील दोन दीवसात महा मेट्रो व्दारे कुठलेही साकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे ठरल्याप्रमाणे आज दि.11 सप्टेंबरला नागपुर जिल्हा N.S.U.I तर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष, कुणाल राऊत, महासचिव, अजित सिंग, व नागपुर जिल्हा N.S.U.I अध्यक्ष आशिष मंडपे यांच्या नेतृत्वात नागपुर विद्यापीठ ते बर्डी मेट्रो स्टेशन पर्यन्त *” अधिकार रैली ” काढण्यात आली व पदादिकारी व कार्यकर्ते मेट्रो स्टेशन च्या आत प्रवेश घेण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस व कार्यकर्यकर्त्यामधे हलक्या स्वरुपाची झडप झाली त्यात काही कार्यकरतांना गंभीर जखमी झाले. तर कार्यकर्त्यांचा रोष पाहुन पोलिस विभागाने मेट्रो पदाधिकार्य्यांना सुरक्षेच्या दुष्टिने आंदोलकांशी संवाद साधला.परंतु येत्या 15 दिवसात यावर योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मेट्रो च्या अधिकार्य्यांना नागपुर जिल्हा N.S.U.I तर्फे देण्यात आला.*

*सदर आंदोलनात आ. अभिजीत वंजारी, तानाजी वनवे व गिरीष पांडव प्रामुख्याने उपस्थित होते, तसेच आसिफ शेख़ , सतीश पाली, प्रतीक कोल्हे, अनिरुध्द पांडे, प्रणय सिंग ठाकुर, सुभाजित कुंदू, चेतन मेश्राम, कुणाल चौधरी, विनोद नौकरिया, सौरभ काळमेघ, चैतन्य सज्जा, इरफान अजमेरी, गौरव भुजाडे, राजरतन रामटेके, प्रवीण शेंडे, रॉयल गेडाम, जैनुअल ओवैस, रौनक नांदगावे, सीमांत गायकवाड़ निशोद महाजन, लव ढोके, विद्यासागर त्रिपाठी, हर्ष बर्डे, मिथिलेश राजपाण्डेय, रितिक बिनेकर तसेच सेकड़ो च्या संखे मधे नागपुर जिल्हा N.S.U.I पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …