*निकालाचा आनंद साजरा करताना मर्यादा ओलांडू नका*
(पो.नी.अशोक कोळी)
*सावनेर पोलीसांकडून कार्यकर्ते व नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन*
सावनेर *दिनांक 24/ 10/19 रोजी मत मोजणी प्रक्रिया असून निवडणूक निकालानंतर काही अतिउत्साही तरुण मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरवणे तसेच विरोधकांच्या दरवाजामध्ये फटाके वाजवणे ,गुलाल उधळणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात त्यामुळे मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात व त्याचे वाईट परिणाम गावातील लोकांना व नातेवाईकांना भोगावे लागतात.*
*दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये तुरुंगामध्ये जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.*
*पुंगळ्या काढून मोटर सायकल फिरवणाऱ्याचे मोटरसायकल चालक यांचेवर वरती कठोर कायदेशीर कारवाई करून मोटरसायकल सुद्धा गुन्ह्यात जप्त करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात येतील.*
*गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी किंवा सरकारी कसलीही नोकरी मिळणार नाही भविष्यकाळातील फायदेही मिळणार नाहीत.*
*ज्याच्यावर गुन्हे दाखल होतील त्यांना भविष्यात पासपोर्ट खाजगी नोकरी मध्ये चारित्र्य पडताळणी सरकारी नोकरी मध्ये चारित्र्य पडताळणी तसेच इतर अनेक उद्योगधंदे करिता लागणारे NOC मध्ये सदर गुन्हे समाविष्ट होऊन सर्व ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात*.
*तसेच सदर प्रकार करण्यामुळे विविध प्रकारच्या कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात.*
*यापूर्वीच गुन्हे दाखल असणाऱ्या इसमांना आणखी गुन्हे दाखल झाल्यामुळे तडीपार तसेच यासारख्या विविध प्रतिबंधात्मक कारवायांचा भविष्यात सामना करावा लागतो.*
*तरी सर्व तरुण मित्रांना व कार्यकर्ते, नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की मत मोजणी दिवशी कायदा व सुव्यवस्था राखून शांतता राखावी असे आवाहन अशोक कोळी पोलीस निरीक्षक सावनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.*