*सोनु सुद च्या हस्ते कल्याणी सरोदे ला इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड २०२१*
*नगरवासियां व्दारे कल्याणी सरोदे चे अभिनंदन करून कौतुकाचा वर्षांव*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नागपुर जिल्हयात विविध क्षेत्रात अलौकिक बुद्धिमत्ता असलेली कांन्द्री-कन्हान ची रहिवासी कल्याणी सरोदे शहरात मेकअप आर्टिस्ट म्हणुन प्रसिद्ध आहे. गोवा च्या रेगिज पार्क रिसॉर्टमध्ये दिनांक २८ ऑगस्ट ला आयोजित कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. ज्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कांन्द्री-कन्हान येथील रहिवासी कल्याणी सरोदे ला सुपरस्टार सोनु सुद च्या हस्ते बाॅलीवुड, सेलि ब्रिटी, मेकअप आर्टिस्ट, इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राची उपराजधानी नागपुर शहरात विविध क्षेत्रात कार्यरत कल्याणी ला ओळखले जाते. गोवा मध्ये आयोजित संस्थापक अमृता राॅय च्या वतीने देशातल्या १६ राज्यातुन आलेले ८२ व्यक्तींना ज्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. अशा व्यक्तींना सुपरस्टार सोनु सुद यांच्या हस्ते अवार्ड प्रदान करून गौरव करण्यात आला. ज्यात कल्याणी सरोदे ला सुध्दा सुपर स्टार सोनु सुद यांच्या हस्ते संपुर्ण महाराष्ट्रातुन व नागपुर जिल्ह्यातुन एकमेव मेकअप आर्टिस्ट अवार्ड, इंटरनॅश नल ग्लोरी अवार्ड २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी लक्ष्मी नारायणा, त्रिपाठी, त्रिधर , अमृता राॅय, संगीत कार, काॅमेडी आदी मान्यवर प्रामु ख्याने उपस्थित होते.
कल्याणी सरोदे हिने इतक्या लहान वयात भरपुर प्रगती केली असुन आपल्या क्षेत्रात खुप मेहनत घेत आहे. आणि या क्षेत्रात मुलींना व मुलांना समोर वाढव ण्याचा संकल्प घेतला आहे. कल्याणी सरोदे ने आप ल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक व परिवारांना दिले आहे. नगरवासियां व्दारे कल्याणी सरोदे चे अभिनंदन करून कौतुकाचा वर्षांव करित आहे.