*भाजपा ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष पदावर श्री अमोल साकोरे यांची नियुक्ती*
*भाजपा पदाधिकार्यांनी पुष्प गुच्छ देऊन केले सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा संघटन मजबूत करण्या करिता भाजपा ओबीसी मोर्चा नागपुर जिल्ह्याचे महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या नेतृत्वात शनिवार ४ सप्टेंबर ला भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष पदावर अमोल साकोरे यांची नियुक्ती करण्यात आली .
भारतीय जनता पक्षाच्या संघटन वाढीत विविध आघाड्यांसह ओबीसी आघाडीचा मोलाचा वाटा असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करीत भाजपा ओबीसी आघाडी नागपूर जिल्ह्याचे महामंत्री श्री.रामभाऊजी दिवटे यांच्या नेतृत्वात व भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या उपस्थिती मध्ये भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहर नवनियुक्त अध्यक्ष अमोल साकोरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , जिल्हामंत्री जयराम मेहरकुळे , तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा , भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर , संजय चोपकर, संजय रंगारी , प्रकाश कामड़े , दिवाकर भोयर , शैलेश शेळके , सौरभ पोटभरे , मयूर माटे , दिनेश नानवटकर , श्रवण वतेकर , विनोद कोहळे सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज