*सीएमइ जीपी योजना मार्गदर्शन शिबिर संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – ऑल सर्विस प्रोव्हाइडर आणि मारोतराव पानतावने कॉलेज कांद्री-कन्हान यांच्या सयुक्त विद्यमानाने मारोतराव पानतावने कॉलेज, गहुहिवरा रोड कांद्री-कन्हान येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजने अंतर्गत एक दिवसीय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कन्हान परिसरातील युवक व नागरिकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या शासनाच्या योजने बाबद सविस्तर माहिती व्हावी आणि लाभ घेण्याच्या निमित्याने शनिवार (दि.२८) ऑगस्ट २०२१ ला सकाळी १०.३० वाजता मारोतराव पानतावने कॉलेज, गहु हिवरा रोड कांद्री-कन्हान येथील शिबीरात आयु हेमंत वाघमारे, मुख्याधिकारी एम सी ई डी हिंगना यांचे मार्गदर्शनात कन्हान-कांद्री परिसरात लघु उद्योग, स्वरोजगार, क्लस्टर आदी उभारण्यात यावे आणि नवीन उद्योग व रोजगार निर्मिती हा प्रमुख उद्देश सार्थ करण्याच्या दुष्टीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे एक दिवसीय शिबीर संपन्न झाले. या शिबीरात मोठया संख्येने कन्हान नागरिकांनि लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजक इंजी प्रा अश्वमेघ पाटिल यांनीं केले होते.
Maharashtra News Media सच की आवाज