Breaking News

*झिल्पी शिवारात आढळले अनओळखी मु्तदेह* *ओळख पटल्यास सहकार्य करावे – पो.नि.सोनवणे*

*झिल्पी शिवारात आढळले अनओळखी मु्तदेह*

*ओळख पटल्यास सहकार्य करावे – पो.नि.सोनवणे*

सावनेर – दिनांक 13/09/2021 रोजी पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे पो.स्टे . केळवद यांना नरेन्द्र डाहाट रा . झिल्पी ता . कळमेश्वर सरपंच झिल्पी – लोहगड यांनी सांयकाळी 06/45 वा . सुमारास माहिती दिली की , मौजा झिल्पी शिवारात बस स्टाफ कडुन गावाकडे जाणार्या डाबरी रोडच्या काही अंतरावर एक अनोळखी इसम वय अंदाजे 40 ते 45 वर्षाचा मृत अवस्थेत मिळुन आला आहे .

त्या अनुशंगाने सदर घटनास्थळी जावुन पाहीले असता सदर ईसमाचे अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट , पांढर्या रंगाची फुल पँट असुन सदर अनोळखी इसमाच्या नाकातुन व तोंडातुन पांढरट फेस आलेला दिसतो .त्याचे उजव्या हातात पिवळसर धातुचे कडे होते.मनगटा पाशी लाल पिवळ्या रंगाचा धागा , बोटामध्ये पांढरट धातुची अंगठी तसेच उजव्या हाताच्या बोटात कासव चिन्ह असलेली पांढरट धातुची अंगठी , कंबरेला काळ्या रंगाचा तुटलेला कमर पट्टा तसेच पायात विटकरी रंगाची चप्पल दिसली .

सदर ईसमाची बांधा मजबुत असुन उंची अंदाजे 175 सेमी आहे . सदर अनोळखी इसमाची सद्यस्थितीत ओळख पटली नसुन कोणी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन केळवद येथील खालील मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी . पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे मो.न. 7020577459 सहायक फौजदार अमरदिप कामठे मो.न. 9923210344 पोलीस स्टेशन केळवद -07113-256922 यावर सुचीत करण्याची विनंती पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे पो.स्टे . केळवद यांनी केली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …