*पारशिवनी तालुक्यात युवा वाॅरियर्स शाखेचे उद्धाटन थाटात संपन्न*
*कन्हान , टेकाडी कोयला खदान , पारशिवनी येथे आयोजन*

*एका महिन्यात युवा वाॅरियर्स शाखा कार्यकारणी गठन करा – चंद्रशेखर बावनकुळे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा वरिष्ठ नेत्यांचा आदेशानुसार युवा वाॅरियर्स शाखा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन कन्हान , टेकाडी कोयला खदान , व पारशिवनी येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश चे महामंत्री श्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व माजी आमदार श्री मल्लिकार्जुन रेड्डी , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे सह आदि च्या प्रमुख उपस्थिती मध्ये पारशिवनी तालुक्यात युवा वारियर्स शाखे चे उद्घाटन करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .

मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर ला भाजपा महाराष्ट्रा प्रदेश अध्यक्ष , प्रदेश महामंत्री व प्रभारी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष , जिल्हा महामंत्री सह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सुचने नुसार पारशिवनी तालुक्यातील कन्हान , टेकाडी कोयला खदान , व पारशिवनी येथे भारतीय जनता पार्टी द्वारे युवा वाॅरियर्स शाखा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश चे महामंत्री श्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व प्रमुख अतिथि रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री मल्लिकार्जुन रेड्डी , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री श्री रामभाऊ दिवटे , जिल्हा महामंत्री जयराम मेहरकुळे , जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे , सह आदि भाजपा वरिष्ठ नेत्यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये युवा वाॅरियर्स शाखेचे उद्धाटन करण्यात आले .

या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश चे महामंत्री श्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकार्यांना संबोधित करुन म्हटले कि एका महिन्याचा आत कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत येणार्या सर्व प्रभागा मध्ये प्रत्येक युवकांच्या भेटी घेऊन युवा वारियर्स शाखा तात्काळ ओपन करावे . तसेच भाजप च्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन करुन पक्षाला मजबूत करण्याचे आव्हाहन केले आहे . कार्यक्रमाचा शेवटी उपस्थित सर्व नागरिकांना अल्पोहार वितिरित करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश चे महामंत्री श्री चंन्द्रशेखर बावनकुळे , रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री मल्लिकार्जुन रेड्डी , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री श्री रामभाऊ दिवटे , जिल्हा महामंत्री जयराम मेहरकुळे , जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे , पंचायत समिति सदस्य नरेश मेश्राम , भाजपा पारशिवनी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक वैद्य , भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष सरिता लसुंते , भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष अमोल साकोरे , भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर , कन्हान – पिपरी नगरपरिषद चे नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका सुषमा चोपकर , अनिता पाटील , संगीता खोब्रागडे , वंदना कुरडकर , वर्षा लोंढे , सुषमा मस्के , स्वाती पाठक , तुलेशा नाटवटकर , राखी परते , समर्थना देशभ्रतार , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , राहुल किरपान , कपिल गायधने , सौरभ पोटभरे , पंकज गोंडाने , मयुर माटे , सचिन वासनिक , अमन घोडेस्वार , अजय लोंढे , मनोज कुरडकर , दिपचंद शेंडे , रिदम शेंडे , रुषभ बावनकर , दिपनकर गजभिए , चंन्द्रकांत बावने , संकेत चकोले , सचिन कांबडे , ओम हजारे , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज