Breaking News

*देवलोक गमन करणार्या आजीची रक्षा शेतात*

*देवलोक गमन करणार्या आजीची रक्षा शेतात*
*शेतीला खत व पर्यावरणाची नीगा़*

सावनेर प्रतिनिधि- सुरज सेलकर 

*लाख बोलक्याहुनी थोर ।*
*एकची माझा कर्तबगार ।।*

*ग्रामगीता अध्याय-२२:- अंत्य-संस्कार*
*मृत्यूसंस्काराचा ऐका खुलासा ।*
*लोक मृत्युसि समजती भलतिसा ।।*
*मी म्हणतो मृत्यु जैसा ।*
*उत्तम नाही कोणीहि ।।४।।*


“राष्ट्रवंदना” ढोल-ताशा व ध्वज पथक, कळमेश्वर, जिल्हा- नागपूर मधील मागील दोन वर्षां पासून जुडलेला महानुभाव पंथाच्या कुटुंबातील एक तरुण सेवक प्रीतम दादा लोणारे, वय २२, मु. कलंबी, यांनी आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांना एकत्रित करून दिनांक- २२/१०/२०१९, मंगळवार रोजी आपली आजी निसर्गवासी सौ. सुमनबाई लोणारे यांच्या अंत्य-संस्कारातील राख नदी-नाल्या मध्ये न शिरवता नदीतील शुद्ध-स्वच्छ पाणी प्रदूषित न व्हावे म्हणून ती राख शेतातील झाडांना टाकुन 3 नवीन झाडे लावून राखीचा चा सदुपयोग केला. या तरुणाने आपल्या सर्व कुटुंबियांची समजूत काडून पर्यावरण पूरक परिवर्तनाचा एक वेगळा आदर्श समाजा सामोरं ठेवला.
*आदर्श न करिता जीवन।*
*कैसा मिळेल आदर्शाचा मान।*
*जगी कैसा होय आदर्श निर्माण।*
*तुकड्या म्हणे।।(ग्रामगीता)*
आज वं. राष्ट्रसंत तुकडोजी महराजांच्या *उठो जवानो कर के बताओ,* *कहने के दीन गये ।।धृ।।* या भजनाचे सार्थक झाले असं वाटलं. तसेच दिनांक-२६/१०/२०१९, शनिवार ला निसर्गवासी सौ. सुमनबाई लोणारे यांच्या अस्थि विसर्जन श्रीगुरूदेव मानव मंदिर रक्षक बाग येरला जि. नागपूर येथील कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृति शांतीवन येथील अस्थी कुंडात करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगीतलेल्या श्रीगुरूदेव पद्धतीने समुदायीक प्रार्थना, श्रद्धांजली, आणि गुरूदेवाच्या जयघोषाच्या गजरात अस्थी विसर्जन केल्या गेले. अस्थी विसर्जनाचे मार्गदर्शन श्रीगुरूदेव सेवामंडळाचे प्रचारक राष्ट्रीय प्रबोधनकार सचिन दादा काळे आणि श्रीगुरूदेव मानव मंदिराचे विश्वस्थ ज्ञानेश्वरदादा रक्षक यांनी केले.
आज पुन्हा एकदा प्रीतम दादा या तरुणाने सिद्ध केलं परिवर्तन हे स्वतःच्या कुंटुबा पासून करून असाच आदर्श सर्व तरुणांनी समाजा समोर ठेवावा.
या सर्व आदर्श कार्याकरीता पथकाचे मार्गदर्शक राष्ट्रीय कीर्तनकार विजय दादा नागपुरे आणि राष्ट्रीय कीर्तनकार सचिन दादा काळे तसेच विश्वव्यापी श्रीगुरुदेव सेवा मंडळ, कळमेश्वर आणि “राष्ट्रवंदना” ढोल-ताशा व ध्वज पथक, कळमेश्वर कडून या परिवर्तनवादी कार्यासाठी सर्व लोणारे कुंटुंबियांच अभिनंदन करण्यात आलं.

( *राष्ट्रवंदना* ढोल-ताशा व ध्वज पथक, कळमेश्वर आणि *विश्वव्यापी श्री गुरुदेव सेवा मंडळ,* कळमेश्वर, जि.- नागपूर)

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …