Breaking News

*मंगळसूत्र चोरटा पोलीसांच्या जाळ्यात*

*मंगळसूत्र चोरटा पोलीसांच्या जाळ्यात*

विशेष प्रतिनिधि
सावनेर – पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 546/2021 भादवि कलम 392 प्रमाणे दिनांक 10/09/2021 रोजी दाखल असुन यातील फिर्यादी सौ दिपा उल्हासराव सुपले वय 44 वर्ष रा नाईक ले आऊट सावेनर यांनी फिर्याद दिली की , दिनांक 10/09/2021 रोजी दुपारी 12.45 वा.चे सुमारास त्या नाईक ले आऊट सावनेर येथील त्यांची मैत्रिण यांच्या प्लॉट नंबर 88 नाईक ले सावनेर येथील घरासमोर मैत्रिणी सोबत रोडवर असताना एका लाल रंगाच्या स्कुटी मोटार सायकलवरील अंगात लाल चौखाडा रंगाचा शर्ट व तोंड दुपटटा घातलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या गळयातील मंगळसुत्र खेचुन बळजबरीने चोरुन नेले आहे त्यावरुन सावेनर पोलीस स्टेशन येथे अपराध दाखल झाल्याने मा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सा . , मा.अपर पोलीस अधीक्षक श्री राहुल माकणीकर सो .. उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर उपविभाग श्री अशोक सरंबळकर साो . यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्याने त्याप्रमाणे त्यांचे मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करुन अज्ञात आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज , गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व गुप्त बातमीदार यांचे मार्फत शोघे घेत असताना पोलीस निरीक्षक श्री मुळुक साहेब यांना बातमी मिळाली की , सदरचा गुन्हा हा आशिकअली गुलामअली शाहा रा . कामठी नागपुर याने केला असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेवुन त्यास सदर अपराधामध्ये दिनांक 14/09/2021 रोजी अटक केली असता पोलीस अटकेदरम्यान त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता त्याने केलेल्या अपराधाची कबुली दिल्याने फिर्यादी यांचे चोरी गेलेले 25 ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले आहे . तसेच अपराधामध्ये वापरलेली लाल रंगाची अॅक्टीवा स्कुटी मोटार सायकलही जप्त करण्यात आली आहे.अपराध घडल्यानंतर 4 दिवसात अज्ञात आरोपीचा शोध घेवुन जबरी चोरीसारखा गुन्हा उघडकीस आणुन अपराधामध्ये चोलीस गेलेले अडीचे तोळे वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले आहे . सदरची कामगिरी ही मा , पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सो .. मा.अपर पोलीस अधीक्षक श्री राहुल माकणीकर सो . , उपविभागीय पोलीस अधिकारी , सावनेर उपविभाग श्री अशोक सरंबळकर साो . यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुलुक , सहा . पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे , पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे , पोलीस हवालदार विजय पांडे , पोलीस नाईक अतुल खोडणकर , अनिल देशमुख , पोलीस कॉन्सटेबल दिनेश घाडगे , प्रकाश ठोके , निलेश तायडे , सचिन लोणारे यांनी पार पाडली आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …