Breaking News

*आरोपी ने केला महिलेचा विनयभंग* *फिर्यादीं यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*आरोपी ने केला महिलेचा विनयभंग*

 

*फिर्यादीं यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन च्या हदीत बुधवार दिनांक १५ सप्टेंबर ला रात्री ९ ते ९:३० च्या सुमारास आरोपी ला फिर्यादी /पिडीता र्हिच्या पतीने उपचाराकरिता लावलेले पैसे मागण्या करिता गेले असता आरोपीतांनी संगनमत करून पतीला व तिला मारहाण करून तिचा अश्लिल शिविगाळ करून विनयभंग केल्याच्या फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून आरोपीताचा शोध कन्हान पोलीस घेत आहे.


कन्हान पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक १५ सप्टेंबर ला रात्री ९ ते ९. ३० वाजता दरम्यान यातील आरोपीला फिर्यादी /पिडीता वय ५१ वर्ष हिच्या पतीने उपचाराकरिता २ लाख २० हजार रूपये लावले होते. ते पैसे परत मागण्याकरिता फिर्यादी व तिचा पती गेले असता आरोपी क्रमांक १, २) रूखमिनी वाघमारे ३) प्रशांत वाघमारे, ४) आशिष प्रेमदास वाघमारे वय ४५ वर्ष चारही राहणार. गणेश नगर प्रभाग क्रमांक ३ कन्हान यांनी संगनमत करून फिर्यादी च्या पतीस हातबुक्याने मारहाण केली. फिर्यादी ही मध्यस्थी आली असता तिला सुध्दा आरोपीतानी मारहाण करून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला व अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन स्टे कन्हान येथे आरोपी विरूध्द कलम ३५४, ३५४ अ, ३५४ ब, ३२३ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. गुन्हयाचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात एपीआई सतिश मेश्राम हे करीत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …