Breaking News

*जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड*

*जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यावर धाड 06 जण ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणने कारवाई करुण 1.15.460 / – रू चा मुद्देमाल जप्त केला.


*दि. 19.09.2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक उपविभाग सावनेर अंतर्गत अवैध धंद्यावर आळा घालणेकामी पेट्रोलींग करीत असता पोस्टे खापा हद्दीतील कन्हान नदी किणाऱ्यावर डोगेघाट जवळ काही इसम 52 ताशपत्या चा पैश्याची बाजी लावुन जुगार खेळत असल्याच्या खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार , स्थानिक गुन्हे शाखा ना.ग्रा . यांचे आदेशाने मौजा डोगेघाट कन्हान नदीच्या काठावर धाड टाकली असता निळया रंगांची ताडपतरी खाली जमिनवर टाकुन त्यावर काही इसम जुगार खेळतांना दिसुन आले मौजा डोगेघाट कन्हान नदीच्या काठावर धाड टाकली असता 06 इसम ताशपत्याचा जुगार खेळतांना मिळुन आल्याने आरोपी 1 ) दिपक देवराव सुरजुसे वय 32 वर्षे , रा . बावनगाव , 2 ) शैलेश नारायण गवळी वय 44 वर्षे , रा . गुमगाव माईन खापा , 3 ) संजय विमाशंकर ढोके वय 46 वर्षे , रा . बावनगाव ता . सावनेर , 4 ) अंकीत विरजु कठोते वय 27 वर्षे , रा.गुमगाव माईल खापा , 5 ) प्रविण लक्ष्मणराव बावने वय 40 वर्षे , रा.खापा 6 ) सतिश भिरावजी गजभिये वय 40 वर्षे , रा . गुमगाव माईन यांचे ताब्यातुन एकुण नगदी 5,450 / – रू . , 02 मोटर सायकल , 01 मोपेड कि . 1,10,000 / – रू व 52 ताशपत्ते असा एकुण 1,15,460 / – रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला . जुगारातील आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशिर कार्यवाही करीता पोलीस स्टेशन खापा यांचे ताब्यात देण्यात आले.

*सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री . राकेश ओला , अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणिकर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . अनिल जिट्टावार यांचे मार्गदर्शनात सफौ बाबा केचे , पोलीस हवालदार चंद्रशेखर गडेकर , निलेश बर्वे , महेश जाधव , पोलीस नाईक राजेंद्र रेवतकर , दिनेश आधापुरे किशोर वांदिले यांचे पथकाने पार पाडली*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …