*वेळेवर उपचार केल्याने गायीचे वाचले प्राण* *दद्दु गणविर यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी*

*वेळेवर उपचार केल्याने गायीचे वाचले प्राण*


*दद्दु गणविर यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
खापरखेडा:- काल दिनांक 20/09/21 ला सांयकाळी वार्ड नंबर 4, खापरखेडा येथे एक गाय बीमार अवस्थेत पडलेली होती. गावका-यांनी सकाळी 7:00 वाजता पशूप्रेमी यांना फोन केला असता पशुप्रेमी काही कामात असल्यामळे गावातील नागरिकांचा फोन उचलू शकले नाही तसेच त्यांनी दुपारी 12:30 वाजता पुन्हा फोन केला असता तेव्हा त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क झाला त्यांनी बीमार गाय बद्दल सविस्तरवृत्त सांगितले मि व माझी टिम आम्ही वार्ड नंबर 4, येथे पोचलो तर गाय अतिशय गंभीर परिस्तिथीत पडलेली होती तसेच सकाळ पासून येत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे गाय ओलीचिंब झालेली होती आम्ही घटनास्थळी पोचून गायची तपासणी केली असता तिची प्रकृती गंभीर होती. आम्ही तिला औषधीचा पहिला डोस देऊन घटनास्थळून निघून गेलो गायीने तेलकट व शिळ्या अन्नाचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने गायीचे पोट फुगलेले होते. त्यामुळे गायीला श्वास घेण्याकरिता त्रास होत असल्यामुळे तिच्यावर औषधीचा उपचार केला. आता गायची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र सोमकुवर, विलीन बागडे , अजय वाळके, दद्दू गणवीर आदी उपस्थित होते*.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …