Breaking News

*चाचेर येथील मुख्य डांबरी मार्गाची विल्लेवाट लावा अन्यथा आंदोलन – कैलाश बरबटे* *गावातील मार्ग झाला जीवघेणा* *कैलास बरबटे यांचे संबंधित अधिकार्यांना निवेदन*

*चाचेर येथील मुख्य डांबरी मार्गाची विल्लेवाट लावा अन्यथा आंदोलन – कैलाश बरबटे*

*गावातील मार्ग झाला जीवघेणा*

*कैलास बरबटे यांचे संबंधित अधिकार्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

मौदा – मौदा तालुक्यातील बाजार चौक चाचेर- येथील मुख्य डांबरी मार्गाची चांगलीच वाट लागल्याने पावसामुळे खड्डे तैयार झाल्याणे हा मार्ग आता नागरिकासाठी जीवघेणा ठरत आहे. प्रशासनाने तात्काळ या मार्गाची दुरुस्ती करावी अन्यता चाचेर -रामटेक मुख्य मार्गावर आंदोलन करू असा ईशारा जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांनी दिला आहे .


चाचेर बसटॉप ते बाजार चौक मुख्य मार्ग असल्याने हा मार्ग गावातून जाते. जागोजागि खड्डे पडल्याने यांची तक्रार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांना जिल्हा परिषद.सदस्य कैलास बरबटे यांनी पत्राद्वारे केली होती.
त्या अनुशंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या कामासाठी 20 लक्ष रुपये मंजूर केले आहे. परंतु सतत पावसामुळे डांबरीकरणाचे काम होऊ शकत नाही. करिता दिनांक 14/ 9/ 2021ला पुन्हा कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग नागपूर यांना जिल्हा परिषद सदस्य बरबटे यांनी पुन्हा पत्र देऊन पडलेले खड्डे त्वरित बुझवण्याकरिता विनंती केली. हे खड्डे 8 दिवसाच्या आत न बुझवल्यास चाचेर -रामटेक मुख्य मार्गावर चक्का जाम आंदोलन करू असा ईशारा जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांनी दिला आहे .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …