*देशातील वीज कंत्राटी कामगारांचे रेल्वे मंत्री यांना निवेदन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- महाराष्ट्रा सह देशातील सर्व राज्यातील वीज उद्योगातील लाखो कंत्राटी कामगारांच्या समस्यां या गंभीर आहेत. या वीज कंत्राटी कामगारांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी देश पातळीवर अखिल भारतीय संविदा मजदूर संघ ही संघटना कार्यरत आहे.
देशभरात संघटनेचे लाखो सभासद असून सर्व राज्यातील कामगारांच्या समस्या केंद्रीय ऊर्जामंत्री मा.आर.के. सिंह यांच्याकडे मांडण्यासाठी महाराष्ट्रातील केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री मा.ना.रावसाहेबजी दानवे यांना आज शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी पुण्यात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
देशभरातील वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या मा.केंद्रीय ऊर्जामंत्री यांच्याकडे दिल्ली येथे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे. निवेदन देताना निलेश खरात, उमेश आनेराव, राहुल बोडके, प्रवीण पवार व श्रीराम जाधव उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज