Breaking News

*सावनेर मधे सतवा माता मंदिरातुन दानपेटी फोडून अंदाजे दोन तीन हजाराची रोख केली लंपास*

*चोरट्याचा सटवा मातेलाच जोगवा*


*दानपेटी फोडून अंदाजे दोन तीन हजाराची रोख केली लंपास*

सावनेर : *शहरातील सटवा माता मंदिरात दुपारी १ च्या दरम्यान अनोळखी चोरट्याने केला मंदिरातील दानपेटी वर हात साफ*
*दुपारी १च्या सुमारास शांततेचा फायदा घेत ४० ते ४५ वयो गटातील एका चोरट्याने सटवा माता मंदिरात प्रवेश करुन तेथील दानपेटी लोखंडी अवजाराने फोडुन अंदाजे दोन ते तीन रुपयांवर हात साफ करित पळ काढला.*
*काही वेळेने मंदिरातील पुजारी परत आल्यावर दानपेटी फुटलेली आढळली . सदर प्रकार सिसिटीवी फुटेज तपासला असता संपूर्ण प्रकार लक्षात आला.*
*मंदिराच्या गाभार्‍यात असलेल्या सिसिटिवी कॅमेरात सर्व प्रकार कैद झाला असुन सदर लेखी तक्रार सावनेर पोलिस स्टेशन ला करण्यात आली असुन पुढील तपास सावनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात सुरु असुन चोरट्याची ओळख पटली असुन सावनेर पोलिसांचे गुन्हे पथक चोरट्याच्या शोधात रवाना झाले असुन लवकरच चोरट्यास जेरबंद केल्या जाणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी दीली.*
*बस स्थानक परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी व विशेषतः जागु्त मंदिरात सुध्दा चोरटे दिवसा ढवळ्या चोरी करत असल्याने चोरट्यांना आता देवांची ही भीती राहली नाही अश्या चर्चा रंगत आहे*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …