Breaking News

*आजपासुन तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जड वाहतुक बंद होणार काय ?* *नप येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर पासुन जड वाहतुक बंद करण्याचा निर्णय ला प्रतिसाद मिळणार काय ? नागरिकांन मध्ये चर्चा सुरु* *कन्हान पोलीस प्रशासन जड वाहनांवर किती कारवाई करणार ? नागरिकांचे लक्ष*

*आजपासुन तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जड वाहतुक बंद होणार काय ?*

*नप येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर पासुन जड वाहतुक बंद करण्याचा निर्णय ला प्रतिसाद मिळणार काय ? नागरिकांन मध्ये चर्चा सुरु*

*कन्हान पोलीस प्रशासन जड वाहनांवर किती कारवाई करणार ? नागरिकांचे लक्ष*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा रेती चे ओव्हर लोड जड वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने स्थानिक नागरिकांना द्वारे आमदार , कन्हान पोलीस निरीक्षक व संबंधित अधिकार्यांना निवेदन पत्र देऊन जड वाहतुक बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असताच सोमवार दिनांक २७ सप्टेंबर ला दुपारी १:०० वाजता कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे जड वाहतुक च्या मुद्यावर चर्चा सभेचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये नगर परिषद प्रशासन , पोलीस प्रशासन , व संबंधित अधिकार्यांन सोबत चर्चा करुन ३० सप्टेंबर पासुन जड वाहतुक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता . या निर्णया ला किती प्रतिसाद मिळणार व कन्हान पोलीस प्रशासन जड वाहनांवर किती कारवाई करणार ? या कडे नागरिकांचे लक्ष असुन विविध चर्चा नागरिकांन मध्ये सुरु झाल्या आहे .


तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन होणारी जड वाहतुक बंद करण्याचा मागणी साठी दिनांक १७ सप्टेंबर २०२१ ला श्री वर्धराज पिल्ले शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकार्यांनी तसेच दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी कन्हान – पिपरी नगरपरिषद चे नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर केले होते . त्या अनुषंघाने सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी कन्हान – पिपरी नगर परिषद येथील सभागृहात रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली‌ होती . या सभे मध्ये कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , आरटीओ अधिकारी , ट्रांसपोर्टर अधिकारी , सर्व नगरसेविक , नगरसेविकां , व विविध विभागाचे संबंधित अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते . या सभे मध्ये आमदार आशिष जयस्वाल यांनी ट्रांसपोर्टर मालकानां सोबत चर्चा करुन व इतरांशी चर्चा करुन ३० सप्टेंबर पासुन तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन होणारी जड वाहतुक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता . आमदार आशिष जयस्वाल यांनी सर्वानुमते घेतलेल्या निर्णयाचा प्रतिसाद किती मिळणार ? ट्रांसपोर्टर मालकानां दिलेल्या निर्णयाचा (आदेशांचा) पालन ट्रांसपोर्टर मालक किती करतात व कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे व आरटीओ अधिकारी जड वाहनांवर किती कारवाई करतात . हे पाहणे योग्य असुन या कडे नागरिकांचे लक्ष असुन विविध चर्चा नागरिकांन मध्ये सुरु झाल्या आहेत .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …