Breaking News

*प्रगती नगर क्रांद्री येथील प्लाॅट धारकांची फसवणूक* *शिवधुऱ्याच्या जागेवर ले-आऊट टाकुन केले विक्रीपत्र* *एसडीओ व तहसिलदार यांचे कडे तक्रार दाखल करून न्यायाची मागणी*

*प्रगती नगर क्रांद्री येथील प्लाॅट धारकांची फसवणूक*

*शिवधुऱ्याच्या जागेवर ले-आऊट टाकुन केले विक्रीपत्र*

*एसडीओ व तहसिलदार यांचे कडे तक्रार दाखल करून न्यायाची मागणी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – मौजा कांद्री व सिहोरा येथील सरकारी जागेवर (शिवधुऱ्यावर) आपली मालकी हक्क दाखून प्लॉट पाडुन प्लाॅट धारकासोबत प्लाॅट मालक राजेश यादव यांनी कांद्री ग्राम पंचायत सरपंच व सचिव यांना ही अंधारात ठेवुन खोटा नकाशा व लेआऊट मंजुर करून प्लाॅट विकुन धोकाधाडी केल्याचा प्रगती नगर येथील नागरिकांनी पत्र परिषदेत पुराव्यासह आरोप केला.
पत्रपरिषदेत सांगितले की, कांद्री (गुजर) अंतर्गत सर्वे नंबर.२४० या शेती मध्ये ३८ प्लाॅट पाडुन राजेश दोकवडी कल्पे (यादव) व संजु दोकवडी कल्पे (यादव ) दोघे ही राहणार. गांधी चौक, रेल्वेस्टेशन रोड कन्हान. यांनी कांद्री-सिहोरा शिवधुऱ्यावर आपले मालकी हक्क दाखवुन प्लॉट पाडून प्लॉट धारका सोबत धोकाधाडी केली. त्यांची जमीन सर्वे नंबर. २४० सातबारा प्रमाणे आराजी ०.७५ हेक्टर आर (७५०० चौ.मीटर) म्हणजे ८०,७३० चौरस फुट जागा होते. मात्र कांद्री ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिव यांना धोक्यात ठेऊन दिनांक.१९ मे २००६ च्या मासिक सभेत ठराव क्रमांक. अनुसार नवीन ले-आउट मंजुर नकाशा मध्ये ०.८३ हेक्टर आर.( ८३०० चौ.मीटर) म्हणजेच अंदाजे ९०४९० चौ.फुटा मध्ये प्लॉट व रोड पाडुन प्लॉट धारकांना विकले आहे.
या सोबतच उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात कृषिक शेतीला अकृषिक करण्याकरिता दिनांक.९ मे २००५ रोजी ला सर्वे नंबर.२४० सातबारा प्रमाणे ०.७५ आराजी ( ७५०० चौ.मीटर) ८०७३० चौ.फुट, जागा निवासी वापरा करिता ले-आउट नकाशा मध्ये बदल करून शासन सोबत धोकाधाडी करून निवासी करिता अकृषीकची मंजुरी घेण्यात आली आहे. तलाठी यांचा माहितीनुसार शिवधुरा ५० फुटाचा असतो. सर्वे नंबर.२४० सातबारा ०.७५ हेक्टर आर मध्ये प्लाॅट ०.६० हेक्टर आर (६००० चौ.मीटर) इतक्या जागेत ले-ऑउट पाडायला हवे होते. परंतु त्या वेळेस असलेले तलाठी आपल्या हातात घेऊन कांद्री-सिहोरा शिवधुऱ्या चा बाजुला ले-आउट टाकण्याचा नियमा प्रमाणे ७.५ चौ. मिटर जागा न सोडता सुक्षृत गृहनिर्माण संस्था व्दारे सोडलेल्या जागेवर सुद्धा आपला मालकी हक्क दाखवुन गोर गरीब नागरिकांना फसवून त्यांचा कडून हजारो रूपये घेऊन सरकारी दोन्ही जाग्यात प्लॉट घेऊन धोकाधाडी केलेली आहे. तसेच पूर्ण शिवधुऱ्यावर कब्जा करून प्लॉट विकल्याने कास्तकाराचे जाणे-येणे बंद झालेले आहे. यांची तक्रार जिल्हाधिकारी नागपूर, उपविभागीय अधिकारी रामटेक, तहसिलदार पारशिवनी, अध्यक्षा जि.प. नागपूर, आमदार आशिष जयस्वाल रामटेक, सरपंच व सचिव कांद्री, नगराध्यक्षा नगरपरिषद कन्हान, मंडळ अधिकारी कन्हान, ठाणेदार पोलिस स्टेशन कन्हान यांना दिलेली आहे. परंतु शासनाचे अधिकारी कासव गतीने चालत असल्याचे प्रगती नगर यांचे म्हणणे आहे. यावेळी पत्र परिषदेत अशोक पाटील, श्रवण वतेकर, रतीराम सहारे (माजी सरपंच), दतु खडसे, सुरेश चावके, सुरेश यादव, योगराज अवसरे, मंगेश गजभिये, निलकंठ गजभिये, शिवा हावरे, राजकुमार मेश्राम, पदमाकर वासनिक, सुभाष रोकडे, नरेश सोनेकर, सुभाष ढोके, सुरेश शेंदरे, सूर्यनारायण संभोजी आदी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रतिक्रिया : –

१) श्री बलवंत पडोळे सरपंच ग्राम पंचायत कांद्री

प्रगती नगर कांद्री येथे हा ले-आऊट आदीच्या कार्यकाळात मंजुर झालेला आहे. सात बारा मध्ये ०. ७५ आराजी असल्यावर देखील ९० आराजी मध्ये ले-आउट पाडुन विक्री केली असल्याचे स्पष्ट झाल्याने ग्राम पंचायत वतीने पाठपुरावा करून तहसिलदार व एच डी ओ यांच्या कडे तक्रार केली असुन योग्य ते कारवाई च्या आदेशावर पुढील कारवाई करू, तसा ग्राम पंचायत ठरावात सुध्दा घेतले आहे.
——–
२) मा. प्रशांत सांगोडे तहसीलदार पारशिवनी

प्रगती नगर मौजा कांद्री येथील प्रकरणाची तक्रार तहसिल कार्यालयात आलेली आहे. त्या ले- आऊटची आदी सर्व प्रथम मोजणी करू आणि मोजणी केल्यानंतर मोजणी निष्कर्ष निघेल त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.
———

३) श्री राजेश यादव लेआउट मालक

प्रगती नगर मध्ये ले-आऊ हा कन्हान नगर परिषद हददीत काही संबंध नसुन कांद्री ग्राम पंचायत मध्ये येतो. पाडलेला ले-आऊट मध्ये शिवधु-या पासुन रस्ताचा उल्लेख कांद्री ग्राम पंचायत, पटवारी व तहसि लदार यांचा नकाशावर कुठेही नाही. आपला ले-आऊ ट नियम बाह्य नसुन त्याला सर्व विभागा मार्फत ना हरकत प्रमाणित आहे. शिवाय ले-आऊट ला एन ए ची काॅफी सुध्दा मिळाली आहे. आरोप केलेले व्यक्ती सुध्दा योग्य कारवाईस बाध्य राहील. ले-आऊट संबधीत माझा कडे शासकीय पुरावे असुन सादर करण्यास कधी ही सश्रम आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …