Breaking News

*जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा*

*जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा*


नागपूर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले

नागपुर:- जागतिक फार्मासिस्ट दिन निमित्त विदर्भ फार्मसी असोसिएशन व तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक पदमश्री डॉ.विकास महात्मे (राज्यसभा, सांसद), कार्यक्रमाचे अध्यक्ष फार्मासिस्ट हरिश गणेशानी (महाराष्ट्र स्ट्रेट फार्मसी कॉन्सील) विशेष अतिथी I.P.S विनिता शाहु (नागपूर शहर पोलीस उपायुक्त) फार्मासिस्ट सौ.मोनिका धवड (औषधी निरिक्षीका नागपूर), जेष्ठ पत्रकार राजेंद्र दिवे , फार्मासिस्ट विक्रांत चिलाटे (प्रा. तामगाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी) फार्मासिस्ट निखिल भुते (मुख्य संयोजक-विदर्भ फार्मसी असोसिएशन) व विशेष उपस्थिती डॉ.गणेश मुक्कमवार (माजी अधिष्ठाता- शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, नागपूर नितीन रोंगे अध्यक्ष, महाविदर्भ जनजागरण, डॉ. दिलीप नरवाडिया (अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद) फार्मासिस्टनी अभिजित दरवडे (कोषाध्यक्ष – विदर्भ फार्मसि असोसिएशन) फामासिस्ट कमलेश माचेवार ( प्रा. तायवाडे कॉलेज ऑफ फॉर्मसी) सौ. प्रविणा दाढे (मिसेस नागपूर विजेत्या ) किशोर चन्नै (सरचिटणीस – संताज समता परिषद) यावेळी कार्यक्रमात कोविड काळात प्राण गमावलेल्या फार्मासिस्ट स्व.केदार जोशी व फार्मसिस्ट स्व.हिमांशु पांडे यांना श्रद्धाजली देण्यात आली, व फार्मसी क्षेत्रात कोविड मध्ये दिवस रात्र रूग्ण सेवा देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी फॉर्मसी क्षेत्रात येण्यात अडचणी संसदेत मांडणार व केंद्र सरकार तर्फे तोडगा काढणार, हरीश गणेशानी यानी आपल्या मार्गदर्शनात जागतिक औषधीनिर्माण दिनाचे महत्व सांगितले. राजेन्द्र दिवे यानी फार्मसी क्षेत्रात येणाया अडचण ला तोडगा काढावा यांचे मार्गदर्शन दिले, तसेच सौ. मोनिका धवड (औषध निरिक्षीका, नागपूर विभाग) यांनी कोरोना वॅक्सिंगचे महत्व सांगितले. समाजात कोरोना व शीनेशन बदल असलेला भ्रांतीला दुर करण्याचे आवाहन केले. IPS विनिता शाहू (पोलीस उपायुक्त, नागपूर) यांनी कोविंड काळात फार्मसिस्ट लोकांनी समाजासाठी केलेले अभुतपूर्व कार्यरत अभिवादन केले. निखिल भुते यानी प्रास्ताविक मध्ये विदर्भ फार्मसी असोसिएशन द्वारा झालेल्या कार्याची माहिती दिली. केतन पटेल, मनोज कोले, चेतन मेश्राम, पंकज बाते, हाफिज साबरी , अशोक जैन, नरेश निमजे, निलेश कोठारी, अश्विनी भुते, भावना चौधरी याना कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आले. मनोज कोल्हे यांनी कार्यक्रमांचे संचालन केले व आभार प्रदर्शन प्राचार्य विक्रांत चिलाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष आभार आचल मेश्राम, अंकाशा सडकमे, आयुश संभारे, दर्शन अलासपुरे, रुषी असोले , दयानेश्वर पाटिल, अश्विनी पाटिल उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …