*चला रक्तदान करून इतरांना जीवदान देऊया*

वरोरा प्रतिनिधी – मूजम्मील शेख
वरोरा – महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून
सदभावना एकता मंच व पोलिस विभागिय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने 2 आॕक्टोबर ला पोलिस स्टेशन वरोरा ईथे सकाळी 10-00 ते दुपारी 4-00 पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे व रोग निदान शिबीराचेआयोजन करण्यात आले आहे . उपविभागीय अधिकारी वरोरा मा. सुभाष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व नव्यानेच रुजू झालेले पोलिस उपविभागीय अधिकारी मा. आयुष नोपानी आय. पी. एस. यांच्या हस्ते उदघाटन संपन्न होणार आहे . या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड , जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डाॕ अनंत हजारे , तहसिलदार मॕडम रोशन मकवाणी , मुख्याधिकारी न. प. गजानन भोयर , संवर्ग विकास अधिकारी पं. स. राजेश राठोड , ठाणेदार दिपक खोब्रागडे , वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड व वैद्यकीय अधिकारी राठोड हे उपस्थित रहाणार असून मोठ्या संख्येत रक्तपुरवठा करण्याची संपूर्ण तयारी सदभावना एकता मंच व पोलिस विभाग विभाग वरोरा च्या टिम ने पूर्ण केलेलि आहे . आयोजकांनी वरोरा व परिसरातील समस्त युवक , युवती , पुरुष व महिला यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे व या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आव्हान केलेले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज