*सासरच्या जाचाला कंटाळुन नवविवाहितीची आत्महत्या*

*कन्हान पोलीस स्टेशन येथे पती, सासु , सासरा व दिरा विरूध्द गुन्हा दाखल , पुढील तपास सुरू*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – एक वर्ष चार महिने अगोदर लग्न झाले ल्या विवाहीतीचा गळफास लावुन आत्महत्या केल्याच्या पती च्या तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला तपास करित असतांना माहेरच्या नातेवाईकांच्या बयाणा वरून सासरच्या जाचाला कंटाळुन नवविवाहिता मिनाक्षी हीने आत्महत्या केल्याने तिचे पती, सासु, सासरा व दिरा विरूध्द कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीसांनी पुढील तपास सुरू केला आहे .

आकाश धनराज भोंडेकर वय २५ वर्ष राहणार हरिहर नगर कांद्री कन्हान याने तक्रार दिली की त्याचे तुमसर भंडारा येथील मिनाक्षी राजु तांडेकर हीचे सोबत दिनांक.१० मे २०२० ला हिन्दु रितीरिवाजा प्रमाणे मुलीचा राहाते घरी लग्न झाले. आकाश हा दिनांक.१६ सप्टेबंर २०२१ ला रामटेक येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमात जावुन दिनांक.१७ सप्टेंबर २०२१ ला ३ ते ३.३० वाजता कांद्री येथे घरी आले असता त्याच्या बेडरूम मध्ये त्या ची पत्नी मिनाक्षी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तेव्हा त्याने ईतरांचा मदतीने मिनाक्षी ला दवाखाण्यात नेले असता डाँक्टरांनी तिला मृत घोषित केले. अशा फिर्यादी आकाश भोंडेकर यांच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन कन्हान येथे मर्ग क्रमांक.३५/२१ कलम १७४ जाफौ दाखल आहे. सदर मर्गची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक आत्राम यांना दिली असता त्याचा चौकशी दरम्यान त्यानी मृतक महिला मिनाक्षी आकाश भोंडेकर हिच्या आई-वडीलाचे तसेच बहीणीचे बयाण नोंदविले असता त्यानी त्याचा बयाणात सांगीतले की लग्नानंतर आकाश हा मिनाक्षी ला दारू पिऊन मरायचा आणि लग्नात कोणत्याही वस्तु दिल्या नाही म्हणुन आकाश त्याचे आई-वडिल आणि भाऊ हे मिनाक्षी चा मानसिक छळ करायचे त्यामुऴे मिनाक्षी चा आई-वडीलांनी आकाश ला जवऴपास ५० ते ६० हजाराचे गृहउपयोगी वस्तु घेवुन दिल्या तरी मोटर सायकल घेण्यासाठी तुझ्या माहेरहुन पैसे आण असे म्हणुन तिचा मानसिक छळ केला. तु नेहमी ईतका वेळ कोणाशी बोलत राहते असे म्हणुन आकाश ने मिनाक्षी ला मारझोड करून तिचा मोबाईल व सिम तोडुन टाकला. मिनाक्षी ही ऐकटीच तिचा माहेरी गेली. तेव्हा तिने तिचा आई-वडीलांना सांगीतले की, आकाश हा रोज दारू पिऊन मला मारतो. त्या बाबद सासुला सांगीतले असता माझा मुलगा पहिले असा नव्हता तुझा सोबत लग्न झाल्या नंतर तो दारू प्यायला लागला. तु कोणत्या कामाची नाहीश. असे म्हणुन तिचा मानसिक छळ केला. तिचा सासराने तिला तु आमचा घरात शनि घेऊन आली आहेस. असे बोलत होते. व तिचा दिराने पति, सासु व सासऱ्या समोर मिनाक्षी च्या कमरेत लाथ मारून तिची मानसिक आणि शारीरिक छळवनुक केली. मिनाक्षी ही माहेरून जेव्हा सासरी आली तेव्हा आकाश ने शुल्लक कारणावरून तिचा तोंडावर लाथ मारून नाक फोडले होते. तेव्हा शेजारी राहणारे मारोती मामानी तिला दवाखान्यात नेले होते. जेव्हा पोळ्याचा सणाला मिनाक्षी ही जेव्हा आपल्या माहेरी गेली होती. तेव्हा तिने तिचा आई वडीलांना सांगीतले की, आकाश च्या आईने म्हटले की, तुझा डाँक्टराकडे ईलाज करून सुध्दा मुलबाळ होत नाही. असे म्हणुन मिनाक्षी सोबत झगडा भांडण केले. तेव्हा मिनाक्षीने प्रतिकार केला असता आकाश ने तिचा उजव्या हाताचा दंडावर चावा घेतला. पोळयाच्या सणानतंर मिनाक्षी जेव्हा सासरी आली तेव्हाच आकाश आणि तिच्या सासु-सासऱ्या ने तु गावावरून आलीस तर गाडीचे पैसे आणि उपचारा साठी पैसे आणले का ? मिनाक्षीने नाही म्हटले असता आकाशने आणि मिनाक्षीच्या सासुने तिचे केस पकडुन मारहाण केली. दिंनांक.१७ सप्टेंबर. २०२१ रोजी मिनाक्षी आकाश भोंडेकर हिला हुंड्यासाठी तसेच मोटर सायकल घेण्यासाठी तसेच मुलबाळ होत नाही. तुझ्या उप चारासाठी माहेरून पैसे आणावे याकरिता तिचा पति आकाश धनराज भोंडेकर वय २५ वर्ष, सासु चंपाबाई धनराज भोंडेकर वय ४५ वर्ष, सासरा धनराज भोंडेकर वय ५१ वर्ष, दिर विकास धनराज भोंडेकर वय २१ वर्ष चौघेही राहणार.वार्ड क्रमांक ०१ हरिहर नगर कांद्री कन्हान जि. नागपुर यांनी मिनाक्षी ला क्रुर वागणुक देवुन तिची शारीरिक, मानसिक व आर्थिक छळवनुक केली. त्यामु ळे सासरच्या छळाला कंटाळुन तिने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे चौकशी दरम्यान निष्पन झाल्या वरून तपास अधिकारी कन्हान पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम यांनी आरोपी विरूध्द कलम ३०४ (ब), ४९८ (अ), २९४, ५०६ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम हे करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज