*मध्यप्रदेश येथुन कांद्री च्या चोरी केलेल्या ट्रक सह दोन आरोपींना अटक*
*स्थानिक गुन्हा शाखा नागपुर ग्रामिण पथकांची कारवाई*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रमांक. ५ येथुन श्री दर्शन टिकम यांचे मालकीचा ट्रक कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असता स्थानिक गुन्हे शाखे च्या पथकाने मध्यप्रदेश येथुन दोन आरोपींना ट्रक सह अटक करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केले.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक .१२ सप्टेंबर चे रात्री ११ ते सोमवार दिनांक.१३ सप्टेंबर चे सकाळी ५ वाजता दरम्यान श्री दर्शन रघुनंदन टिकम वय ३० वर्ष राहणार.कांद्री वार्ड नंबर ५ कन्हान याचे मालकीचा ट्रक क्रं. एम.एच ४० बी.जी ५२५९ ज्याचा चेसिस नंबर. ४४४०२६ctz७११०७८ व इंजिन नंबर ६९७tc५७ct z८२१५०३ अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रूपए चा ट्रक कोणीतरी अज्ञात चोराने चोरी केला. अश्या श्री. दर्शन टिकम च्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रंमांक.३३९/२०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस निरीक्षक अनिल जिट्टेवार यांच्या मार्गदर्शनात एक पथक मध्यप्रदेश येथे जावुन छानबीन करीत असतांना बुधवार दिनांक.२९ सप्टेंबर २०२१ ला दोन आरोपींना ट्रक सह अटक करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले.
सदर कारवाई स्थनिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण चे सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, सायबर सेलचे सतिश राठोड, हेकॉं विनोद काळे, नाना राऊत, एनपीसी अरविंद भगत, शैलेश यादव, पोशि प्रणय बनाफर, विरू नरड, महेश बिसने, दासी, साहेबराव बिहाडे सह आदीने शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली. असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल रामटेके हे करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज