Breaking News

*कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात रूग्णवाहिका चालक उपलब्ध करण्याची मागणी* *सामाजिक कार्यकर्त्यांचे नप नगराध्यक्षा व वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन*

*कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात रूग्णवाहिका चालक उपलब्ध करण्याची मागणी*

*सामाजिक कार्यकर्त्यांचे नप नगराध्यक्षा व वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात गेल्याा काही दिवसान पासुन रूग्णवाहिकेचे चालक नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी नप नगराध्यक्षा व वैद्यकीय अधिकारी कन्हान यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन देऊन प्राथमिक आरोग्य केंन्द्रात तात्काळ रूग्णवाहिका चालक उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
कन्हान-पिपरी शहरात, परिसरात व आजु बाजुच्या छोट्या मोठ्या खेड्या गावात जळपास ६०,००० ते ७०,००० लोकसंख्या असल्यामुळे कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे तिन रूग्णवाहिका असुन एकच चालक आहे. तो एकच रूग्णवाहिका चालक असुन १२ तास ड्युटी केल्यानंतर पण तो २४ तास ड्युटी करत असतो व त्याची जर गैरहजरी झाली. आणि त्याची झोप न झाल्यामुळे अपघात पण होऊ शकतो. कधी काळी प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे एमरजेंसी पेशंट येत असतो परंतु रूग्णवाहिका चालक उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना भंयकर त्रास सहन करावा लागत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी कन्हान-पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर व कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन देऊन तात्काळ कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे रूग्णवाहिका चालक उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. अन्यथा साखळी उपोषण करण्यात येईल अशी चेतावनी सुध्दा दिली आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता विपिन गोंडाने, प्रकाश तिमांडे, रजनिकांत कारेमोरे, शिवदास मोहोड, ऋृषभ जाधव, प्रविण गोडे, प्रतिक भोपले, संजय वानखेडे, रुपेश गजभिये, अनिकेत कारेमोरे, अजय वानखेडे नागरिक उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …