Breaking News

*जागतिक औषधीनिर्माता दिवसाचे आयोजन संपन्न*

*जागतिक औषधीनिर्माता दिवसाचे आयोजन संपन्न*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपुर:- श्री सच्चिदानंद शिक्षण संस्था द्वारा संचालित तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी व तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी कोराडी नागपूर , यांच्या सयुंक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत औषधीनिर्माता जागतिक दिवस साजरा करण्यात आला , या प्रसंगी कोराडी महादुला परिसरातील विविध औषधीनिर्माता यांना कोविड योध्या म्हणून पुरस्कृत करून सन्मान चिन्ह देण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. ए. डोईफोडे , विक्रांत चिलाटे तसेच रा. से. यो चे प्रमुख प्रा. कमलेश माचेवार , महिला तकरार निवारण समिती प्रमूख प्रा. दीपिका कलोडे, प्रा हर्षा राऊत त्याच प्रमाणे टी. आय. डी. पी. चे प्रा. प्रीति ठाकरे, प्रा. मनीषा वाल्दे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोहनीश जुनघरे, आयुष हासोरीया, निकिता साधवानी ,रुपाली मगरडे, तनवी इंगले , सुमीत भेले उपस्थित होते.
या प्रसंगी कोराडी येथील औषधीनिर्माता १) न्यू कैवल्य मेडिकल स्टोर (प्रो. मनीष चिंचुळकर )२) ओम साई मेडिकल ( प्रो. प्रशांत वर्मा )३) निर्मल मेडिकल स्टोर ( प्रो, प्राणिका लोधी वर्मा )४) शर्मा मेडिकल अँड जनरल स्टोर (प्रो. रमेश परसराम जानियानी ) ५) कोशा मेडिकल ( प्रो. प्रीती घासे)
यांना कोविड योध्या म्हणून सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …