Breaking News

*कन्हान हनुमान नगर येथुन दुचाकी वाहन चोरी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*कन्हान हनुमान नगर येथुन दुचाकी वाहन चोरी*

 

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर कन्हान येथुन आकाश ठाकरे याच्या घरा समोर उभी ठेवलेली दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.२९ सप्टेंबर ला सायंकाळी ४:३० ते ७:४५ वाजता दरम्यान आकाश राधेश्याम ठाकरे वय २४ वर्ष राहणार. हनुमान नगर कन्हान यांची हिरो कंपनीची सुपर स्पेलंडर काळ्या रंगाची दुचाकी वाहन क्रमांक. एम एच ४० ए वाय ४३१० ज्याचा चेसीस क्रं. एमबीएलजेए०५ईएमजी९ए३२९६० इंजिन क्रं. जेए०५ईसीजी९ए३२१६० ची किंमत ४०,००० रू. ची दुचाकी वाहन घराच्या आंगनात समोर उभी करून ठेवले असता कोणतरी अज्ञात चोराने चोरून नेली आहे. अश्या फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस काॅस्टेंबल प्रविण ओमप्रकाश चव्हान हे करीत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …