*बोरुजवाड़ा येथे घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी*

*घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी*


*साखर झोपेत काळाने केला घात*

* तालुका प्रतिनिधी- आशीष लोधी*

*सावनेर नजीक च्या बोरुजवाडा येथे आज पाहटे घराची भींत दुसर्याच्या घरावर पडून दोन ईसमाचा मु्त्यू तर एक महिला गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने एकच शोककळा पसरली*
*मिळालेल्या माहिती नुसार बाबुराव धोटे यांच्या घराची जुनी भिंत कमजोर होऊन शेजारच्या निंबाळकर यांच्या टिनाच्या पतर्याच्या घरावर पडल्याने घरात गाढ झोपेत आसलेल्या दोन लोकांचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी 6-00 वाजता च्या दरम्यान सावनेर तालुक्यातील बोरुजवाडा या गावात घडली.*


*मृतक सुरेश रामकृष्ण कान्हारकर वय 40 राहणार बोरुजवाडा आणि अतुल शिवराम उईके वय 16 वर्ष राहणार बोरुजवाडा यांचा मृत्यू झाला. तर अतुल ची आई उर्मिला शिवराम उईके या गंभीर जखमी झाला आहे. मृतक आणि जखमी हे बोरुजवाडा येथे जुन्या घरी किरायाने राहत होते. अवकाळी पावसामुळे विटांची भिंत कमकुवत झाली होती. भिंत कोसळून खाली पडली तेव्हा भीती खाली तिघेही आले असल्याने ही विदारक घटना घडली. या घटनेची माहिती गावात काही क्षणातच पसरली. घटना स्थळावर गावकऱ्यांनी गर्दी केली.*


*व सदर घटनेची सावनेर पोलीसांना सुचना मीळताच पोली निरिक्षक अशोक कोळी आपल्या स्टाफ सह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ पंचनामा करून शवविच्छेदन गृह सावनेर येथे शव विच्छेदनासाठी दोघांचे शव रवाना करण्यात आले असून जखमी महिला उर्मिलाला नागपूर मेयो रुग्णालयात हलविण्यात आले आहे.*
*गेल्या 10 वर्षापासून तिघेही किरायाने बोरुजवडा येथे राहत होते.मृतक हे मोल मजुरीचे काम करणारे होते.पाहटेच्या साखर झोपेत असतानाच काळाने झाप घालुन काळी कळण्या आधिच सर्व संपवून टाकल्याची हळहळ गावकरी व्यक्त करत आहेत*
*पोलीस निरिक्षक अशोक कोळी याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …