*पारशिवनी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिति च्या निवडणुकी मध्ये काॅंग्रेस चा दणदणीत विजय*
*मंत्री सुनील केदार , जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या विकास कामाला मिळाले यश*
*भाजपा , शिवसेने पराभव*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवनी – पारशिवनी तालुक्यातील करंभाड जिल्हा परिषद तसेच चारगाव पंचायत समिति व नयाकुंड पंचायत समिति वर काॅंग्रेस उम्मेदवारांनी राज्य पशु संवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पडोळे , काॅंग्रेस पार्टी नागपुर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक , व जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या नेतृत्वात दणदणीत विजय मिळवला असुन भाजपा व शिवसेनेच्या उम्मेदवारांना दारुने पराभव करुन जिल्हा परिषद व पंचायत समिति वर आपला झेंडा फडकविल्याने काॅग्रेस पार्टी च्या उम्मेदवारांनी व पदाधिकार्यांनी ढोल ताशाच्या गजरात विजय रैली काढुन व मिठाई वाटप करुन मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला .

पारशिवनी तालुक्यातील करंभाड जिल्हा परिषद सर्कल मध्ये काॅंग्रेसच्या उम्मेदवार अर्चना दिपक भोयर यांना ६७९३ मते मिळाली असुन शिवसेने च्या उम्मेदवार संजीवनी गोमकाळे यांना ४७६१ मते मिळाली असुन भाजप च्या उम्मेदवार प्रभावती कडु यांना ३०५८ मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडी च्या उम्मेदवाराला ७३० मते मिळाली व नोटाला १४० मते मिळाली असुन या सर्कल मध्ये १५४५२ मतदान झाले असुन २०३२ मतांनी काॅंग्रेसच्या उम्मेदवार अर्चना दिपक भोयर यांचा विजय झाला असुन नयाकुंड पंचायत समिति सर्कल मध्ये भाजप च्या उम्मेदवार आशा चौधरी यांना ११८२ मते मिळाली असुन शिवसेने च्या उम्मेदवार सुनिता तायवाडे यांना २८९१ मते मिळाली असुन काॅंग्रेस पार्टी च्या उम्मेदवार मंगला निबोंने यांना ३३४५ मते मिळाली तर नोटाला १९७ मते मिळाली असुन या सर्कल मध्ये एकुण ७६१५ मतदान झाले असुन ४५४ मतांनी काॅंग्रेसच्या उम्मेदवार मंगला निबोंने यांचा विजय झाला असुन चारगाव पंचायत समिति सर्कल मध्ये शिवसेने च्या उम्मेदवार किसन घंगारे यांना २१६१ मते मिळाली असुन काॅंग्रेस च्या उम्मेदवार तुलसी दियेवार यांना २५७१ मते मिळाली असुन भाजप च्या उम्मेदवार शिशुपाल बेदरे यांना ८७२ मते मिळाली असुन प्रहार चे उम्मेदवार चंन्द्रशेखर राऊत यांना ७१४ मते मिळाली तर अपक्ष विठ्ठल पाटील यांना ९८७ मते मिळाली असुन या सर्कल मध्ये एकुण ७३८४ मतदान झाले असुन ४१० मतांनी काॅंग्रेसच्या उम्मेदवार तुलसी दियेवार यांचा विजय झाला . अश्या प्रकारे काॅंग्रेस पार्टी च्या उम्मेदवारांनी भाजपा व शिवसेनेच्या उम्मेदवारांना दारुने पराभव करुन जिल्हा परिषद व पंचायत समिति वर काॅंग्रेस पार्टी चा झेंडा फडकविल्याने काॅग्रेस पार्टी च्या उम्मेदवारांनी व पदाधिकार्यांनी ढोल ताशाच्या गजरात विजय रैली काढुन व मिठाई वाटप करुन मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला .

या प्रसंगी युवक कॉंग्रेस आशीष भड , युवा कॉंग्रेस नेते अज्जु पठान , पंचायत समिति उपसभापति चेतन देशमुख सह आदि काॅंग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज