*कुक्कुटपालन व्यवसायातून बचत गट महिलांनी आर्थिक उन्नती साधावी*

*जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन*
विशेष प्रतिनिधि – श्रीकांत दुर्गे
अहेरी :- तालुक्यातील ग्राम पंचायत पेरमिली अंतर्गत येत असलेल्या आलदांडी येते आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन द्वारा अनुदानित गडचिरोली महिला कुक्कुटपालन कंपनी मर्या. आल्लापली, महाराष्ट्र राज्य जिवानोन्नती अभियान (उमेद) तथा नॅशनल स्माल होल्डर पोल्ट्री डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनात काली कंकली महिला बचत गट यांच्यासाठी कुक्कुटपालन केंद्र उभारण्यात आले असुन आज या कुक्कुटपालन केंद्रांच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम महिलांनी आर्थिक उन्नती साधावी महिला बळकट झाल्यास कुटूंबाच्या राहणीमानाचा जिवन उंचावेल तसेच आधी महिलांना चुल व मूल सांभाळणे इतकेच समजत होते. मात्र आज सर्वच ठिकाणी महिलांनी प्राधान्य देण्यात येत आहे. आपल्या या ग्रामीण भागात रोजगारच कसल्याही प्रकारचा संधी उपलब्ध नाही. आज बचत गटाचा माध्यमाने रोजगार उपलब्ध होत आहे. याठिकाणी कुक्कुटपालन केन्द्र उभारण्यात आले आहे आणि कोंबड्याचे लहान लहान पिल्ले या केंद्रात देण्यात आले आहेत. सदर कोंबड्यांचे योग्य देखरेख करून बचत गटाच्या महिलांनी बाजारपेठेत विक्री केल्यास रोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध होईल तसेच महीलांच्या आर्थिक उन्नती होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले.
या कुक्कुटपालन केंद्रांच्या उद्घाटन गडचिरोली जिल्हा महिला कुक्कुटपालनचे अध्यक्ष सौ. पदमा आलाम यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अहेरीचे उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अंकित, अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प. अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. भाग्यश्रीताई आत्राम, पेरमिलीचे सरपंचा श्रीमती किरण नैताम, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, पेरमिलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.पं. सदस्य प्रमोद आत्राम मंचावर उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी अंकित, माजी जि.प. अध्यक्ष सौ. भाग्यश्रीताई आत्राम, लाटकर आदिंनी मार्गदर्शन केले.
यावेळी पेरमिलीचे उपसरपंच सुनील सोयाम, बंडु आत्राम, ऍड. हनमंतु आकदर, प्रशांत गोडसेलवार, साजन गावडे, श्रीकांत बंडामवार, कवीश्वर चंदनखेडे तसेच महिला बचत गटांचे सदस्य, गावातील नागरिक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज